१४ दिवसांत १४६८ चालकांवर कारवाई
By Admin | Updated: January 30, 2016 00:24 IST2016-01-30T00:14:46+5:302016-01-30T00:24:14+5:30
उस्मानाबाद : शहर वाहतूक शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहमध्ये १४ दिवसात तब्बल १४६८ चालकांवर कारवाई करून एक

१४ दिवसांत १४६८ चालकांवर कारवाई
उस्मानाबाद : शहर वाहतूक शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहमध्ये १४ दिवसात तब्बल १४६८ चालकांवर कारवाई करून एक लाख ५६ हजार १०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला़ या सप्ताहादरम्यान विविध उपक्रमांद्वारे वाहतूक नियमांची जनजागृती करण्यात आली़
वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी, वाढलेल्या अपघातात घट व्हावी आदी विविध उद्देशानह शहर वाहतूक शाखेकडून १० ते २४ जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात आली आहे़ या कालावधीत पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सपोनि प्रशांत पाटील व त्यांच्या टीमने १४६८ चालकांवर कारवाई करून १ लाख ५६ हजार १०० रूपयांचा दंड वसूल केला़ यात अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या तिघांविरूध्द, मूळ कागदपत्रे न बाळगणाऱ्या ७४० जणांविरूध्द, दुचाकीवर ट्रिपलशिट फिरणाऱ्या २१९ जणाविरूध्द, नंबरप्लेट अपराध प्रकरणी ६७ जणांविरूध्द, चालकाजवळील शिटवर प्रवासी बसविल्याप्रकरणी १४ जणाविरूध्द, वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या ९ जणाविरूध्द, मराठीत नंबर लिहिणाऱ्या एकाविरूध्द, वाहनांवर नंबर नसलेल्या ७२ जणांविरूध्द, मालवाहतूक वाहनात प्रवाशी नेणाऱ्या १० जणाविरूध्द, विरूध्द दिशेने वाहने चालविणाऱ्या १४ जणाविरूध्द, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या तिघाविरूध्द, गणवेशातील पोलिसांचा आदेश न पाळणाऱ्या १० जणांविरूध्द, वाहन परवाना नसताना वाहने चालविणाऱ्या १८ जणाविरूध्द, कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या चौघाविरूध्द, विनास सिटबेल्ट वाहन चालविणाऱ्या १२ जणाविरूध्द, फाळका उघडा ठेवून मालवाहतूक वाहन चालविणाऱ्या ९ जणाविरूध्द, गणवेश न घालणाऱ्या १११ चालकांविरूध्द, वाहनाच काळी फिल्म लावणाऱ्या तिघाविरूध्द, सिग्नल मोडणाऱ्या १०५ जणांविरूध्द अशा विविध प्रकारच्या कारवाई करून हा दंड वसूल केला़ याशिवाय विविध ठिकाणी उपक्रम राबवून विद्यार्थी, चालकांना मार्गदर्शन करण्यात आले़
चालकांची आरोग्य तपासणी
शहरातील बसस्थानकात रिक्षा चालक, बसचालकांसह इतर वाहनांच्या चालकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आले़ या शिबिरात १५० वाहन चालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली़
स्थानकात सूचना फलक लावा
शहरातील बससस्थानकात अनेक मालवाहतूक वाहने, रिक्षा, खासगी वाहने जात आहेत़ अनेकदा बसचालकांसह खासगी वाहनधारकांमध्ये यावरून बाचाबाची होत आहे़ हे प्रकार रोखण्यासाठी एस़टी़महामंडळाने बसस्थानकाच्या ‘इन-आऊट’गेटवर ‘खासगी वाहनास प्रवेश बंद, नो पार्किंग झोन’ आदी सूचना फलक लावावेत, अशा सूचना वाहतूक शाखेकडून देण्यात आल्या आहेत़ (प्रतिनिधी)