पकडायला गेले आरोपी, सापडला मुद्देमाल
By Admin | Updated: May 11, 2014 00:39 IST2014-05-11T00:26:24+5:302014-05-11T00:39:37+5:30
नांदेड :शहरातील शिवाजीनगर भागात रेकॉर्डवरील आरोपींच्या शोधासाठी छापा मारणार्या पोलिसांच्या हाती तब्बल ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लागला़.

पकडायला गेले आरोपी, सापडला मुद्देमाल
नांदेड :शहरातील शिवाजीनगर भागात रेकॉर्डवरील आरोपींच्या शोधासाठी छापा मारणार्या पोलिसांच्या हाती तब्बल ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल लागला़ त्यानंतर पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला़ पोलिस उपअधीक्षक विजय कबाडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीधर पवार यांना गुप्त माहिती मिळाली होती़ त्यानुसार, त्यांनी सपोनि एम़एऩमजगर व पोउपनि शेळके यांना शिवाजीनगर भागातील एका घरात रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती दिली़ त्यानंतर पोलिसांनी एका घरावर छापा मारला़ ही कारवाई ६ एप्रिल रोजी करण्यात आली़ परंतु या ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगार मिळाले नाहीत़ पोलिसांनी घराची झडती घेतली असता मात्र, १ लाख ४८ हजार १६५ रुपये रोख, २१ मोबाईल हँन्डसेट, मनगटी घड्याळ ५,दुचाकी २, अॅपे १, पिवळ्या धातूचे दागिने असा एकूण ३ लाख ३० हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल आढळला़ पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करुन हा मुद्देमाल जप्त केला होता़ तसेच मुद्देमालाची मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी संबंधितांना वेळ दिला होता़ परंतु संबंधितांनी मालकी हक्काचे कोणतेही कागदपत्र सादर केले नाहीत़ त्यानंतर पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे़ परंतु मुद्देमाल नेमका कोणाचा? तो चोरीतील आहे का? आदी अनेक प्रश्नांची उत्तरे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहेत़ (प्रतिनिधी)