खून प्रकरणातील आरोपीस अटक
By Admin | Updated: April 6, 2016 00:38 IST2016-04-06T00:31:35+5:302016-04-06T00:38:09+5:30
परभणी : चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच रात्री पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीस बीड येथून अटक केली आहे़

खून प्रकरणातील आरोपीस अटक
परभणी : चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच रात्री पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीस बीड येथून अटक केली आहे़
३ एप्रिल रोजी रात्री राहुलनगर भागात प्रियंका सोनवणे यांना आरोपी संतोष सोनवणे याने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती़ हे भांडण सोडविण्यासाठी प्रियंका सोनवणे यांचे मामा सुनील गंगा भराडे हे त्या ठिकाणी आले असता, त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले़ या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुनील भराडे यांचा ४ एप्रिल रोजी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला़ दरम्यान, या प्रकरणात नवा मोंढा पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत बीड येथून संतोष आश्रोबा सोनवणे यास अटक केली आहे़ दरम्यान, मंगळवारी या आरोपीस न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़ तपास पोलिस उपनिरीक्षक देशमुख हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)