विशाल फाटे खुनातील आरोपींना शनिवारपर्यंत कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:02 IST2021-05-25T04:02:06+5:302021-05-25T04:02:06+5:30

कुख्यात गुंड विशाल उर्फ मड्या फाटे (२६, रा. वडगाव) याचा गुरुवार (दि. २०) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बजाज ...

Accused of massive murder remanded in custody till Saturday | विशाल फाटे खुनातील आरोपींना शनिवारपर्यंत कोठडी

विशाल फाटे खुनातील आरोपींना शनिवारपर्यंत कोठडी

कुख्यात गुंड विशाल उर्फ मड्या फाटे (२६, रा. वडगाव) याचा गुरुवार (दि. २०) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बजाज नगरात दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सचिन सोमनाथ प्रधान (२९), अजिय सोमनाथ प्रधान (२३) व आशिष लक्ष्मण काळे (३४, सर्व रा. वडगाव) यांना पकडले होते. या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना शनिवारपर्यंत (दि. २९) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

---------------------------------

ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

वाळूज महानगर : ए. एस. क्लब चौकात वळण घेणाऱ्या दुचाकीस्वाराला जखमी करणाऱ्या ट्रकचालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाल्मिक जनार्धन मढीकर (३८, रा. बिडकीन, ता. पैठण) हे शुक्रवारी बिडकीन येथून दुचाकी (एमएच १७, डी ५९७४)ने बहीण लोचन दामले हिला भेटण्यासाठी रांजणगाव येथे निघाले होते. ए. एस. क्लब चौकात वळण घेत असताना, पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रक (केए २५, बी ८२९३)ने वाल्मिक मढीकर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात मढीकर गंभीर जखमी झाले होते. नागरिकांनी जखमी मढीकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी वाल्मिक मढीकर यांच्या तक्रारीवरुन ट्रकचालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--------------------------

Web Title: Accused of massive murder remanded in custody till Saturday