खूनप्रकरणी आरोपीला ७ दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 20:22 IST2019-12-08T20:22:29+5:302019-12-08T20:22:41+5:30
क्षुल्लक कारणावरुन अनोळखी तरुणाचा खून करणाऱ्या सचिन पवार याला रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

खूनप्रकरणी आरोपीला ७ दिवसांची कोठडी
वाळूज महानगर : क्षुल्लक कारणावरुन अनोळखी तरुणाचा खून करणाऱ्या सचिन पवार याला रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पंढरपूरात शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा मृतदेह मिळून आला. अज्ञात मारेकऱ्यांने त्या अनोळखी तरुणाचा दगडाने ठेचून खुन करुन पसार झाला होता.
या खुनाच्या प्रकारानंतर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड, सहा.निरीक्षक विजय घेरडे, उपनिरीक्षक विठ्ठल चास्कर,सहा.फौजदार राजेश वाघ, पोहेकॉ.वसंत शेळके, वसंत जिवडे, पोना. बाबासाहेब काकडे आदींची पथकाने अवघ्या ६ तासांत खुनाचा छडा लावत सचिन पवार (२२ रा.बकवालनगर) याला वैजापूर तालुक्यातील डाक पिंपळगाव येथून अटक केली.
रविवारी सचिन पवार याला न्यायालयात हजर केले असता त्याला १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मृताची ओळख पटेना
अनोळखी तरुणाचा मृतदेह शासकीय रुग्णालयातील शवागृहात ओळख पटविण्यासाठी ठेवण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची दिवशी या परिसरातील विविध व्यवसायिकाकडे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज तपासणीचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.
वाळूज परिसरात दोन दिवसांपूर्वी कुणी बेपत्ता झाला आहे का याची शहानिशा केली जात आहे. मृत अनोळखी तरुणाच्या शर्टावर असलेल्या केतन टेलर्स नाशिक याचा शोध घेऊन त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सहायक निरीक्षक विजय घेरडे यांनी सांगितले.