जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:05 IST2021-09-04T04:05:01+5:302021-09-04T04:05:01+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्टला बिअर बारमध्ये फिर्यादी राहुल रामदास राक्षे (२४, रा. कुरण, ता. अंबड) हा ट्रॅक्टरचालक ...

Accused of attempted murder arrested | जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्टला बिअर बारमध्ये फिर्यादी राहुल रामदास राक्षे (२४, रा. कुरण, ता. अंबड) हा ट्रॅक्टरचालक मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करत होता. त्या ठिकाणी आरोपी संत्या बोबडे हा भाजी घेण्यासाठी गेला. त्या दरम्यान फिर्यादी व आरोपींमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात आरोपी संत्याने राहुलच्या पोटात, पाठीत चाकूने वार करून बिअरची बाटली डोक्यावर फोडली व तेथून पसार झाला होता. राहुल राक्षेला उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी ३० ऑगस्टला एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात संतोष बोबडेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. शुक्रवारी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळताच सपोनि. भागवत नागरगोजे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. मात्र तो नदीत लपून बसला होता. तेथेच त्याला पकडण्यात आले.

फोटो कॅप्शन : जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या एमआयडीसी पैठण पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

Web Title: Accused of attempted murder arrested