अहमदपुरात चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास अटक
By Admin | Updated: November 16, 2014 00:37 IST2014-11-16T00:26:57+5:302014-11-16T00:37:25+5:30
लातूर : शहरातील बसस्थानक परीसरात शुक्रवारी झालेल्या साडेतीन लाखांची चोरीबाबत एका संशयीत आरोपीला शनिवारी ताब्यात घेण्यात आले आहे़

अहमदपुरात चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास अटक
लातूर : शहरातील बसस्थानक परीसरात शुक्रवारी झालेल्या साडेतीन लाखांची चोरीबाबत एका संशयीत आरोपीला शनिवारी ताब्यात घेण्यात आले आहे़
शहरातील बसस्थानकामध्ये शुक्रवारी चाकूर येथील सचिन राजकुमार पाटील हे शेतकरी सोयाबीन विक्री करुन साडेतीन लाख रुपये बॅगमध्ये घेऊन बसस्थानकातून सोलापूर नांदेड बसमध्ये चाकूरकडे जाण्याच्या तयारीत असताना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्या शेतकऱ्याच्या हातातील पिशवीस ब्लेड मारुन साडेतीन लाख रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली गिते यांनी तपासाची चक्रे गतीमान करुन उदगीर येथील बसस्थानक परिसरात बालाजी सुभाष गायकवाड (वय ३०, राग़ांधी नगर, बीड) याला शुक्रवारी गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे़ (प्रतिनिधी)
अहमदपूर येथील स्थायी गणेश मिल्ट्री कॅम्प रुद्दापाटी येथील सोलार लाईटच्या खांबावरील बॅटरी व वायरची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास देविदास वामनराव मुरकुटे (रा़लिंबाळवाडी, हा़मु़ रुद्दापाटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अहमदपूर पोलिसात रामदास बालाजी दहिफळे (रा़चिखली) याच्या विरुद्ध कलम ३७९, ५११ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़