खून प्रकरणातील आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:51 IST2017-09-05T00:51:32+5:302017-09-05T00:51:32+5:30

हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे पत्नीचा खून करुन तिच्या अंगावरील दागिने घेऊन पसार झालेल्या आरोपीला ४ सप्टेंबर रोजी न्यायालय परिसरात बेड्या ठोकल्या.

The accused arrested in the murder case | खून प्रकरणातील आरोपीस अटक

खून प्रकरणातील आरोपीस अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे पत्नीचा खून करुन तिच्या अंगावरील दागिने घेऊन पसार झालेल्या आरोपीला ४ सप्टेंबर रोजी न्यायालय परिसरात बेड्या ठोकल्या.
बासंबा येथे १ सप्टेंबर रोजी पत्नी सीता यांचा खून करुन तिच्या अंगावरील दाग-दागिने घेऊन आरोपी पती वसंता घुगे फरार झाला होता. त्याने दागिने नेल्यामुळे पोलिसांनी सोन्या-चांदीची दुकाने पिंजून काढली होती. तर परिसरातील ढाबे व दारुच्या दुकान परिसरात त्याचा बारकाईने शोध घेतला जात होता. मात्र आरोपी पोलिसांना चकवा देत होता. तर बासंबा शाखेच्या बँकेत पैसे भरतानाही गावातील लोकांना आढळून आला होता. मात्र त्यावेळी त्याची माहिती पोलिसांना विलंबाने कळाली होती. त्यामुळे त्याला पकडता आला नाही. तर सोमवारी न्यायालय परिसरात तो घुटमळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी वेळेत सापळा लावून आरोपीस बेड्या ठोकण्यात यश मिळविले.
यासाठी पोनि सरदारसिंग ठाकूर, जगन पवार, अनिल भुक्तर, एन. आर. राठोड, मदन पवार, वाढवे यांनी सापळा लावला होता.

Web Title: The accused arrested in the murder case