शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्यापासून बँक अध्यक्षासह आरोपी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:10 PM

नोकरीच्या आमिषाने तरुणाकडून पैसे घेऊन नोकरी न लावता कामावरून काढून टाकत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे. के. जाधवसह अन्य आरोपी अटकेच्या भीतीने पसार झाले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी आणि कार्यालयात जाऊन आले; मात्र तेथे ते सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

औरंगाबाद : नोकरीच्या आमिषाने तरुणाकडून पैसे घेऊन नोकरी न लावता कामावरून काढून टाकत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे. के. जाधवसह अन्य आरोपी अटकेच्या भीतीने पसार झाले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी आणि कार्यालयात जाऊन आले; मात्र तेथे ते सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.कृष्णा ऊर्फ किशोर रतनराव चिलघर (रा. संजयनगर) याने १७ जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कृष्णाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी १७ जानेवारीला रात्री लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे.के. जाधव, त्यांचा मुलगा विक्रांत जाधव, बँकेचे अधिकारी संजय औटी, उमेश दिवे आणि अन्य दोन जणांविरोधात गुन्हा नोंदविला. गुन्हा नोंद होताच पोलीस अधिकारी आरोपींना पकडण्यासाठी त्यांच्या घरी आणि कार्यालयात गेले; मात्र ते सापडले नाहीत. अटकेच्या भीतिपोटी आरोपी पसार झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी दिली. दरम्यान, बँक अधिकारी औटी यांनी अटकपूर्व जामीन मिळावा, याकरिता न्यायालयात अर्ज दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपा