शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

तीन तासांत दोघांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:55 AM

रस्त्याची चाळणी : नागपूर -मुंबई महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

लासूर स्टेशन : अवघ्या तीन तासांत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात मोटारसायकलवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नागपूर -मुंबई महामार्गावरील आरापूर-वसूसायगाव दरम्यानच्या तीन किलोमीटर अंतरावर रविवारी घडली.या महामार्गावर गेल्या सहा दिवसांत झालेल्या चार अपघातात चार जणांचा बळी गेला आहे. अत्यंत दयनीय अवस्था झालेला नागपूर -मुंबई महामार्ग हा दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.नारायण मुरलीधर लंबे (४८, रा.भोकरगाव ता. वैजापूर) असे रविवारी दुपारी अडीच वाजता झालेल्या अपघातातील मयताचे नाव आहे. तर सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या अपघातातील मयताचे नाव संदीप नारायण राठोड (२८, रा.राणेगाव, ता. शेवगाव) असे आहे.नारायण व त्यांचे भाऊ राजाराम हे दोघे कांदा चाळीसाठी स्टील बघण्यासाठी करोडी परिसरातील कंपनीत गेले होते. परत येत असताना दुपारी अडीच वाजता आरापूर शिवारात एका हॉटेलसमोर वैजापूरकडून येणारा ट्रक क्रमांक सी. जी. ०७. आर. यू.९२२२ व औरंगाबादकडून येणारी मोटारसायकल क्रमांक जी. जे. ०५ सी.सी. २७३९ यांची समोरासमोर धडक झाल्याने नारायण यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे भाऊ राजाराम मुरलीधर लंबे हे गंभीर जखमी झाले.या अपघातानंतर तीन तासात वसूसायगाव येथील गतिरोधकाजवळ आयशर टेम्पोने मोटरसायकलस्वारास चिरडल्याची घटना घडली. संदीप नारायण राठोड हा त्याचा मामेभाऊ किशोर उत्तम चव्हाण (रा. अंबड तालुका) याच्यासोबत मोटारसायकल क्रमांक एम. एच. २३. ए. क्यू. ५२७५ वरून औरंगाबाद येथून येत असताना पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. २३. डब्ल्यू. ९९७ने धडक दिली. यात चाकाखाली चिरडल्याने संदीपचा जागीच मृत्यू झाला. लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. भाग्यश्री डोंगरे व डॉ. सोनाली जानकर यांनी दोघांना तपासून मयत घोषित केले. नागपूर -मुंबई महामार्गाची अक्षरश: चाळणी झाली असून, खड्डे वाचविण्यासाठी वाहनधारकांना रॉग साईडने वाहन घ्यावे लागते. त्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.गेल्या सहा दिवसात गेले चार बळी२३ एप्रिल रोजी विश्वंभर मदन मोगरे (२७, रा. आहेर बोरगाव, ता. सेलू. जि. परभणी), २७ रोजी शिवनाथ सोमनाथ साठे (३२, रा. माळीवाडा ता. जि. औरंगाबाद) व २९ एप्रिल रोजी हे दोघे गतप्राण झाले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू