शीख भाविकांच्या लक्झरीला अपघात
By Admin | Updated: August 7, 2014 23:29 IST2014-08-07T23:09:27+5:302014-08-07T23:29:27+5:30
हिंगोली : आचानक समोर आलेल्या गायीला चुकवण्याच्या प्रयत्नात लक्झरी पलटी होवून झालेल्या अपघातात सहा शीख भाविक जखमी झाले.

शीख भाविकांच्या लक्झरीला अपघात
हिंगोली : आचानक समोर आलेल्या गायीला चुकवण्याच्या प्रयत्नात लक्झरी पलटी होवून झालेल्या अपघातात सहा शीख भाविक जखमी झाले. हिंगोली-नर्सी रोडवरील देऊळगाव रामा शिवारात गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळावरून जखमींना हिंगोलीतील सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हिंगोली तालुक्यातील नर्सी येथील श्री संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी नांदेड येथून ३० शीख भाविकांची लक्झरी निघाली. दरम्यान हिंगोली तालुक्यातील देऊळगाव शिवारात समोर आलेली गाय चुकवण्यासाठी रस्त्याच्या खाली टायर घालताना लक्झरी उलटून अपघात झाला. माहिती मिळताच सामान्य रूग्णालयाची दक्षता रूग्णवाहीका घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत किरकोळ जमखी झालेल्या सहा भाविकांना नर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जास्त मार लागल्याने विरेंद्र सिंग, प्रकाश सिंग, सुखजित सिंग, सरबजीत सिंग, महेल सिंग यांना हिंगोलीतील जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. तिथे डॉ. व्ही. एन. रोडगे, डॉ. पुंडगे, डॉ. संतोष परदेशी, डॉ. नितीन अग्रवाल, डॉ. नंदकुमार करवा, डॉ. फरीन उस्मानी यांनी उपचार केले. दरम्यान ग्रामीण ठाण्याचे सपोउपनि एन.आर. राठोड, शेख शकील आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. (प्रतिनिधी)