पोलिसांच्या वाहनाला अपघात; नगरचे तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:45 IST2017-08-06T00:45:06+5:302017-08-06T00:45:06+5:30
अहमदनगरहून नागपूरकडे जाणाºया पोलिसांच्या बोलेरो वाहनाचे टायर फुटून झालेल्या अपघातात तीन पोलीस जखमी झाले.

पोलिसांच्या वाहनाला अपघात; नगरचे तिघे जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अहमदनगरहून नागपूरकडे जाणाºया पोलिसांच्या बोलेरो वाहनाचे टायर फुटून झालेल्या अपघातात तीन पोलीस जखमी झाले. जालना-औरंगाबाद मार्गावरील बारवाले महाविद्यालयाजवळ शनिवारी सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली.
जखमींची नावे अरविंद भास्कर गिरी, लक्ष्मण बबन बंडकर, सलीम अमीर शेख, अशी असून ते अहमदनगर पोलीस दलात कार्यरत आहेत. हे सर्वजण कमांडो कोर्सच्या प्रशिक्षणासाठी नगरहून बोलेरो जीपने (एमएच १६,एन ५१३)
नागपूरकडे निघाले होते. जालना-औरंगाबाद मार्गावरील बारवाले महाविद्यालयाजवळ मागील टायरमध्ये खिळा घुसल्याने भरधाव जीप दुभाजकाला धडकून उलटली. यात जीपमध्ये बसलेले वरील तिघे किरकोळ जखमी झाले, तर गाडीचे रेडिएटर व काचा कुटल्या.
चंदनझिरा पोलिसांनी जखमी पोलिसांना शासकीय रुग्णालयात हलविले. प्रथमोपचारानंतर पोलीस नागपूरला न जाता नगरकडे रवाना झाले.
या प्रकरणी अरविंद गिरी यांनी दिलेल्या माहितीवरून चंदनझिरा ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. पोलीस काँस्टेबल अविनाश नरवडे तपास करत आहेत.