वेरुळजवळील अपघात, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:05 IST2021-04-23T04:05:21+5:302021-04-23T04:05:21+5:30

वेरुळ : सोलापूर - धुळे महामार्गावरील वेरुळ पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. या ...

Accident near Eluru, one killed | वेरुळजवळील अपघात, एक ठार

वेरुळजवळील अपघात, एक ठार

वेरुळ : सोलापूर - धुळे महामार्गावरील वेरुळ पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. या अपघातात वेरुळ येथील सोमिनाथ (किशोर) नारायण जाधव (४५) यांचा मृत्यू झाला. जाधव हे दुपारी आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच २० एफसी ६१३८)ने वेरुळ गावात येत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या जीप क्रमांक (एमएच ०६ एएल ६२८)ने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सोमिनाथ जाधव यांना मार लागल्याने अधिक प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.

या घटनेची माहिती कळताच साहेबराव पांडव, पोलीसपाटील रमेश ढिवरे, सुदाम थोरात, सचिन जाधव, शिवसागर जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी येत जाधव यांना वेरुळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. पांडवे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या अपघाताविषयीची फिर्याद साहेबराव पांडव यांनी खुलताबाद पोलिसात दिली असून, अधिक तपास हेडकाॅन्स्टेबल मनोहर पुंगळे, रमेश छत्रे, आर. एस. भिसे हे करत आहेत.

Web Title: Accident near Eluru, one killed