विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या वाटा झाल्या गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:05 IST2021-07-18T04:05:32+5:302021-07-18T04:05:32+5:30

करमाड : विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या वाटा गतिमान करण्यासाठी कुंभेफळ येथील २२ विद्यार्थिनींना जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांचे ...

Accelerated the share of students' education | विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या वाटा झाल्या गतिमान

विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या वाटा झाल्या गतिमान

करमाड : विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या वाटा गतिमान करण्यासाठी कुंभेफळ येथील २२ विद्यार्थिनींना जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांचे हस्ते सायकल वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत या सायकल वाटप केल्या असून, मुलींना शाळेत जाता यावे व त्यांची शाळेत उपस्थिती वाढावी, असा या मागील उद्देश आहे. यावेळी सरपंच कांताबाई मुळे, उपसरपंच मनीषा शेळके, आयसीडीएसचे सुपरवायजर परदेशी, ग्रामसेविका संगीता तायडे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुळे, ग्रा.पं. सदस्य परमेश्वर शेळके, महेश भोसले, संतोष शेजवळ, गजू भावले, नयना मुळे, आम्रपाली साबळे, गयाबाई शेजुळ, ग्रामस्थ ज्ञानेश्वर शेळके, बद्री मुळे, सुनील मुळे, मुख्याध्यापक, अंगणावाडी सेविकांची उपस्थिती होती.

फोटो कॅप्शन

कुंभेफळ ग्रामपंचायत प्रांगणात सायकल वाटप प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अध्यक्षा मीना शेळके, उपसरपंच मनीषा शेळके, ग्रामसेविका तायडे आदी.

Web Title: Accelerated the share of students' education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.