शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

५०० रुपयांच्या लाचेची मागणी, ३०० वर तडजोड; एसीबीने मुख्याध्यापिकेला रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 18:05 IST

'प्रवेश निर्गम उताऱ्या'साठी ३०० रुपयांची लाच महागात पडली; मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर: शहरातील छावणी भागातील हॉली क्रॉस मराठी हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेला ३०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी, (दि.९ ) रंगेहाथ पकडले. मारिया जोस एस्तीबेरो (५२) असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. शाळेचा 'प्रवेश निर्गम उतारा' देण्यासाठी त्यांनी एका माजी विद्यार्थ्याकडे लाचेची मागणी केली होती.

५०० रुपयांची मागणी आणि पडताळणीतक्रारदाराला त्याच्या वैयक्तिक कामासाठी शाळेच्या निर्गम उताऱ्याची गरज होती. यासाठी त्यांनी मुख्याध्यापिका मारिया एस्तीबेरो यांची भेट घेतली असता, त्यांनी उतारा देण्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने कागदपत्रे स्पीड पोस्टाने पाठवूनही पैशांशिवाय काम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ७ एप्रिल रोजी 'एसीबी'कडे धाव घेतली. ८ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत मुख्याध्यापिकेने ३०० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

सापळा कारवाई आणि जप्तीगुरुवारी दुपारी मुख्याध्यापिका कक्षात सापळा रचला असता, ३०० रुपये स्वीकारल्यानंतर 'एसीबी'च्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम आणि १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सध्या त्यांच्या घराची झडती सुरू असून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. 'एसीबी'च्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे, राजेंद्र नंदिले, सचिन बारसे, आशा कुंटे, चांगदेव बागुल यांच्या पथकाने ही कारवाई केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Headmistress Caught Red-Handed Accepting Bribe for School Leaving Certificate

Web Summary : A headmistress in Chhatrapati Sambhajinagar was arrested by the Anti-Corruption Bureau for accepting a ₹300 bribe. She demanded ₹500 from a former student for a school leaving certificate, even after document submission. Authorities seized cash and her mobile; investigation ongoing.
टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरTeacherशिक्षक