अ.भा.वि.प.चे महाविद्यालय उघडा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:11 IST2021-02-05T04:11:25+5:302021-02-05T04:11:25+5:30
औरंगाबाद : महाविद्यालये व वस्तीगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावीत. या व ईतर मागण्यांसाठी शहरातील देवगिरी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, ...

अ.भा.वि.प.चे महाविद्यालय उघडा आंदोलन
औरंगाबाद : महाविद्यालये व वस्तीगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावीत. या व ईतर मागण्यांसाठी शहरातील देवगिरी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, सरस्वती भुवन महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालय आदी प्रमुख महाविद्यालयांसमोर मंगळवारी अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी ‘महाविद्यालये उघडा’ आंदोलन केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी ‘महाविद्यालय उघडा’ राज्यव्यापी आंदोलन आयोजित केले होते. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादेतील महाविद्यालयांसमोर मंगळवारी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली.
यावेळी अभाविप महानगर मंत्री निकेतन कोठारी म्हणाले की, लॉकडाऊननंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. बाजारपेठा, मॉल, थिएटर, बससेवा ही आस्थापने सुरू झालेली आहेत. त्याचबरोबर माध्यमिक शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत; परंतु राज्यातील महाविद्यालये उघडण्यासाठी शासनाला काय अडचण आहे, राज्य सरकारला महाराष्ट्रातील उच्चशिक्षण बंद पाडायचे आहे का. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या महाविद्यालये सुरु करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर देखिल महाविद्यालये का बंद ठेवली जात आहेत, असे अनेक प्रश्न महाविद्यालयीन तरुणांना सतावत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने जर तात्काळ महाविद्यालये सुरू केली नाहीत, तर यापुढे तीव्र लढा उभारण्यात येईल.
या आंदोलनामध्ये अभाविपचे जिल्हा संयोजक श्यामसुंदर सोडगीर, सहसंयोजक अंबादास मेवनकर, नागेश गलांडे, महानगर मंत्री निकेतन कोठारी, सहमंत्री उमाकांत पांचाळ, सहमंत्री ऋषिकेश केकान, नगरमंत्री उमेश मुळे, गजानन घडामोडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.