जालना तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची लगबग

By Admin | Updated: August 7, 2015 01:12 IST2015-08-07T00:56:50+5:302015-08-07T01:12:56+5:30

जालना : तालुक्यातील ८७ ग्रामपंचायच्या निवडणुका येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार आहेत. या निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार जात प्रमाणपत्र

About 87 gram panchayat elections in Jalna taluka | जालना तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची लगबग

जालना तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची लगबग


जालना : तालुक्यातील ८७ ग्रामपंचायच्या निवडणुका येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार आहेत. या निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करीत आहेत.
जालना तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या आॅक्टोबर महिन्यात होऊ घातल्या आहे. त्यात माळेगाव खु. तांडा, भाटेपूरी, खनेपूरी, वानडगाव, कचरेवाडी, पाचनवडगाव, माळशेंद्रा, बेथलम, रेवगाव, वंजार उम्रद, पोकळवडगाव, गोंदेगाव, थेरगाव, बापकळ, उटवद, कडवंची, नाव्हा, वरूड, घोडेगाव, नसडगाव, धारकल्याण, वउगाव, निपाणी पोखरी, हिवर्डी, सोनदेव, हस्तेपिंपळगाव, पाथ्रुड- गारकुंडी ताडा, पोखरी शिंगाडे, डांबरी, उखळी, चितळी-पुतळी, श्रीकृष्णनगर, जामवाडी, विरेगाव, घाणेवाडी, गुंडेवाडी, धानोरा, निधोना- आंबेडकरनगर, तांदुळवाडी खुर्द- जयभीमनगर, हिवरा रोषणगाव, दरेगााव, हातवन, वडीवाडी, हिस्वण बु., हिस्वण खुर्द, पुणेगाव, इस्लामवाडी, दुधनाकाळेगाव, तांदुळवाडी बु., कारला, ममदाबाद, वझर, वरखेड नेर, सेवली, कोळेवाडी तांडा, घेटुळी, शिवणी, राठोड नगर, काकडा, बोरगाव, पळसखेडा, शंभूसावरगाव, देवमुर्ती, पिरकल्याण, वखारी, बाजी उम्रद, पारेगाव, सावंगी तलान, दहिफळ, मानेगाव, खा., धांडेगाव, निरखेडा, सोमनाथ जळगाव, जळगाव सोमनाथ - ब्राम्हणखेडा, मौजपूरी, भीलपुरी, भीलपूरी खुर्द, सिंधीकाळेगाव, खरपूडी- गोकुळवाडी, रोहणवाडी, लोंढ्याची वाडी, सारवाडी, इंदेवाडी, कुंबेफळ, आंतरवाला, सामनगाव, गोलापांगरी- गोलावाडी, बठाण बु. या ग्रामपंचायतची निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी संबधीत ग्रामपंचायचे आरक्षण, प्रभाग निहाय आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे.
होवू घातलेल्या ८७ ग्रामपंचायतीसाठी २७७ प्रभाग करण्यात आले असून त्यात ७५१ सदस्य आहेत. या ७५१ जागाचे सन २०११ च्या जनगणेनुसार आरक्षण करण्यात आले. त्यात अनुसुचित जातीचे १२० पैकी ८८ महिला, अनुसूचित जमाती ४ पैकी ३ महिला, नागरिकांचा मागासप्रवर्ग १९० पैकी १०१ महिला, सर्वसाधारण ४३७ पैकी २३५ महिला सदस्य राखीव झालेल्या आहेत.

Web Title: About 87 gram panchayat elections in Jalna taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.