शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वन आणि आरोग्य विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने सूमारे 55 लाख रुपयांना गंडविले

By बापू सोळुंके | Updated: March 19, 2023 21:12 IST

तोतया उपजिल्हाधिकाऱ्याकडून तब्बल ५४ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक.

छत्रपती संभाजीनगर: परभणी पोलिसांनी अटक केलेल्या तोतया उपजिल्हाधिकाऱ्याने शहरातील सहा जणांना वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून  तब्बल ५४ लाख ९७ हजार रुपयांची फसवणुक केल्याचे  समोर आले आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तोतया उपजिल्हाधिकाऱ्यासह त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा  नोंदविण्यात आला.

तोतया उपजिल्हाधिकारी अमोल वासूदेव पजई (मराठे) आणि त्याचा साथीदारअनंता मधुकर कलोरे अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार प्रशांत दत्तात्रय भालेराव (३५,रा.हनुमाननगर,गारखेडा) यांची खाजगी ट्रॅव्हल एजन्सी आहे. गतवर्षी २७ ऑक्टोबर २०२२रोजी आरोपीने प्रशांत यांच्याकडून कार भाड्याने नेली होती.तेव्हा त्याने तो उपजिल्हाधिकारी असल्याचे सांगितले होते. यावेळी त्याने त्यांना वन आणि आरोग्य विभागात नोकर भरती सुरू असल्याचे सांगितले.

या दोन्ही विभागात नोकरी लावून देऊ शकतो,असे तक्रारदार यांना सांगितले. तक्रारदार हे सुशिक्षित बेरोजगार असल्याने ते नोकरीच्या आमिषाला बळी पडले.    तक्रारदार यांना वन विभागात पर्यवेक्षक पदी नोकरी लावण्यासाठी त्याने त्यांना १२ लाख रुपये लागतील यातील ८ लाख रुपये आगाऊ आणि नोकरीचे नियुक्तीपत्रे मिळाल्यावर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांनी आरोपीला ८ लाख६० हजार  रुपये दोन्ही आरोपींच्या बँक खात्यात जमा केले.

यानंतर तक्रारदार यांनी त्यांना वन विभागातील नोकरीचे नियुक्तीपत्र तक्रारदार यांना दिले. यासोबतच आरोपींनी अन्य बेरोजगार संजय विजय मुळे,कृष्णा राजू वाघमारे,शाम तुकाराम शिंदे आणि गौरव धर्मराज गोसावी यांच्याकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले. तर अशोक मनोहर विखे यांच्याकडून १४लाख३७ हजार रुपये नोकरीच्या आमिषाने उकळले. आपल्याकडून पैसे उकळणारा तोतया उपजिल्हाधिकारी असल्याचे समजताच तक्रारदार यांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून आरोपींविरोधात त्यांनी तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चंदने तपास करीत आहेत.परभणी पोलिसांनी पकडल्यानंतर झाली तोतयागिरी उघडकीसउपजिल्हाधिकारी असल्याचे सांगून नोकरीच्या आमिषाने आपल्याकडून पैसे उकळणाऱ्या अमोल पजई(मराठे)हा तोतया असल्याची बातमी तक्रारदार प्रशांत आणि इतरांनी वाचली.  पोलिसांनी त्यास अटक केल्याचे न्यूज चॅनलवरही तक्रारदार यांनी पाहिली आपली फसवणुक झाल्याचे समजले. सहा जणांची तब्बल ५४ लाख ९७ हजाराची फसवणुक करण्यात आल्याचे समोर आले.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस