‘त्या’ गर्भपात केंद्राचा शोध सुरू; बलात्कार प्रकरणी चौकशी

By Admin | Updated: March 31, 2015 00:38 IST2015-03-31T00:04:32+5:302015-03-31T00:38:16+5:30

लातूर : एमआयडीसी भागातील एका दालमिलमध्ये विधवा महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथील गोविंद मुकिंद आळंदकर

'The' abortion center is under investigation; Inquiry in rape case | ‘त्या’ गर्भपात केंद्राचा शोध सुरू; बलात्कार प्रकरणी चौकशी

‘त्या’ गर्भपात केंद्राचा शोध सुरू; बलात्कार प्रकरणी चौकशी


लातूर : एमआयडीसी भागातील एका दालमिलमध्ये विधवा महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथील गोविंद मुकिंद आळंदकर (वय २९) व त्याचा मामा रमेश श्रीपती सूर्यवंशी (४४, रा़माताजी नगर, लातूर) या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. शिवाय, ‘त्या’ गर्भपात केंद्राचा शोधही पोलिस घेत आहेत.
या प्रकरणी कोठडीत असलेल्या आरोपींचे जबाब घेण्याचे काम सुरु असून, वैद्यकीय तपासणी ही करण्यात आली आहे़ विधवा महिलेचा गर्भपात कोठे करण्यात आला, याची विचारणा सुरु आहे़ लवकरच गर्भपात केंद्राचा शोध लागेल, असे तपास अधिकारी सपोनि आऱपी़ शेळके यांनी सांगितले़
दरम्यान, पीडित महिलेचा २० आठवड्याचा गर्भ बेकायदेशीररित्या नष्ट करणाऱ्या रुग्णालयाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी शिवराष्ट्र सेवा संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़
पीडित महिलेचा गर्भपात लातूरच्या एका रुग्णालयात झाल्याचा आरोप शिवराष्ट्र सेवा संघाने निवेदनात केला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची तपासणी करुन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवराष्ट्र सेवा संघाचे संस्थापक अ‍ॅड़ निलेश करमुडी, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा नागापुरे, रमाकांत आर्वीकर, शंकर स्वामी, सलिम बागवान आदींनी निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'The' abortion center is under investigation; Inquiry in rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.