शाळेतून परतणाऱ्या शिक्षकाचे अपहरण

By Admin | Updated: January 14, 2015 01:01 IST2015-01-14T00:27:12+5:302015-01-14T01:01:01+5:30

विडा : शाळेतून घरी कारने निघालेले एक शिक्षक गेल्या चोवीस तासापासून बेपत्ता आहेत. त्यांचे अपहरण करण्यात आले असून घातपाताचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी पोलीसांकडे दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे

Abduction of a teacher who returned from school | शाळेतून परतणाऱ्या शिक्षकाचे अपहरण

शाळेतून परतणाऱ्या शिक्षकाचे अपहरण


विडा : शाळेतून घरी कारने निघालेले एक शिक्षक गेल्या चोवीस तासापासून बेपत्ता आहेत. त्यांचे अपहरण करण्यात आले असून घातपाताचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी पोलीसांकडे दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. गेली पाच वर्षापासून सुरू असलेल्या राजकीय वादातून हा प्रकार घडला असावा, असेही तक्रारीत म्हटले आहे.
केज तालुक्यातील घाटेवाडी येथील शिवाजी बाबुराव गायकवाड (४५) हे बुरांडवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. सोमवारी सकाळी शाळेच्या तपासणीसाठी अधिकारी येणार असल्याने ते लवकरच घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते उशिरापर्यंत घरी आले नसल्याने त्यांचे भाऊ अशोक यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली.
विडा गावापासून सहा किलोमिटर अंतरावरील पिंपळगावच्या पुलाजवळ शिवाजी यांची कार त्यांना दिसली. कारचे सर्व दरवाजे उघडे होते आणि त्यांचे घड्याळ, मोबाईल, चप्पल आणि डायरी तेथेच रस्त्यावर पडलेली त्यांना दिसली. दुसऱ्या दिवशीही त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. (वार्ताहर)

Web Title: Abduction of a teacher who returned from school