ऊसतोड मजुराचे अपहरण
By Admin | Updated: November 12, 2014 00:26 IST2014-11-12T00:03:12+5:302014-11-12T00:26:40+5:30
धारूर : जीप आडवी लावून गाडीमधून बाहेर ओढून कारखान्याच्या पैसे देण्याच्या कारणावरून ऊसतोड मजूराचे अपहरण करण्यात आले़ त्यानंतर डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी धारूर ठाण्यात तिघांविरूध्द

ऊसतोड मजुराचे अपहरण
धारूर : जीप आडवी लावून गाडीमधून बाहेर ओढून कारखान्याच्या पैसे देण्याच्या कारणावरून ऊसतोड मजूराचे अपहरण करण्यात आले़ त्यानंतर डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी धारूर ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा नोंद झाला आहे़
भागवत सीताराम गवळी, शंकर भागवत गवळी (दोघेही रा़ ढगेवाडी) व कृष्णा उखंडे (रा़ धारूर) अशी आरोपींची नावे आहेत़ जहाँगीरमोहा येथील ऊसतोड मजूर वचिष्ट कठाळू सिरसट व त्याची पत्नी हे एका कारमधून धारूर घाटातून रविवारी जात होते़ चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारसमोर वरील आरोपींनी जीप आडवी लावली़ त्यांना गाडीच्या बाहेर ओढत कारखान्याचे पैसे देण्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली़ त्यानंतर गाडीमध्ये बसवून पळवून नेले़ या प्रकरणी वचिष्ट सिरसट यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून धारूर ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे हे करीत आहेत़ (वार्ताहर)