पैशाच्या वादातून अपहरणनाट्य
By Admin | Updated: August 21, 2014 00:11 IST2014-08-21T00:10:43+5:302014-08-21T00:11:44+5:30
औरंगाबाद : पैशाच्या देवाण-घेवाणीवरून एक जणाचे अपहरण करून त्याच्याकडून बळजबरीने धनादेशावर स्वाक्षऱ्या घेतल्याची घटना काल्डा कॉर्नर ते हायकोर्ट परिसरादरम्यान घडली.

पैशाच्या वादातून अपहरणनाट्य
औरंगाबाद : पैशाच्या देवाण-घेवाणीवरून एक जणाचे अपहरण करून त्याच्याकडून बळजबरीने धनादेशावर स्वाक्षऱ्या घेतल्याची घटना काल्डा कॉर्नर ते हायकोर्ट परिसरादरम्यान घडली.
काल्डा कॉर्नर येथील रहिवासी जयेश खुशालचंद पारखे (५०) यांचा अकोला येथील नरेंद्र भाला याच्यासोबत पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद सुरू होता. १६ आॅगस्ट रोजी सकाळी भाला व त्याचे सहा साथीदार पारखे यांच्या भावास गावाहून बळजबरीने गाडीत टाकून ‘चल, तुझ्या भावाचे घर दाखव’ असे म्हणत औरंगाबादला घेऊन आले. ते पारखे यांच्या घरी आले.
घरात घुसून या आरोपींनी पारखे यांना धमकावून त्यांच्याकडून वेगवेगळ्या तारखेचे आठ कोरे धनादेश लिहून घेतले. नंतर पारखे यांना बळजबरीने गाडीत बसवून आरोपींनी एक लाख रुपयांचा एक धनादेश वटवून घेतला आणि मारण्याची धमकी देत ते निघून गेले. आरोपींनी सुटका केल्यानंतर पारखे यांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला.