अबब... ६२७ मालमत्ताधारकांकडे १५० कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST2021-02-05T04:14:52+5:302021-02-05T04:14:52+5:30

औरंगाबाद : शहरात मालमत्ता कराची १० लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले ६२७ मालमत्ताधारक निघाले असून, त्यांच्याकडे तब्बल दीडशे कोटी ...

Abb ... 150 crore owed to 627 property owners | अबब... ६२७ मालमत्ताधारकांकडे १५० कोटी थकीत

अबब... ६२७ मालमत्ताधारकांकडे १५० कोटी थकीत

औरंगाबाद : शहरात मालमत्ता कराची १० लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले ६२७ मालमत्ताधारक निघाले असून, त्यांच्याकडे तब्बल दीडशे कोटी थकीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या मालमत्ताधारकांकडून केवळ २ कोटींचा कर वसूल करण्यात मनपाला यश आले आहे. थकबाकी वसुलीसाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे.

शहरातील मालमत्ताधारकांकडे मालमत्ता कराचे ४६८ कोटी रुपये थकीत आहेत. मालमत्ताधारकांची संख्या २ लाख ५२ हजार इतकी असून त्यापैकी ३३ हजार मालमत्ताधारक हे व्यावसायिक आहेत. दरवर्षी मालमत्ता कराची वसुली शंभर टक्के होत नसल्यामुळे थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष बाब म्हणजे या थकबाकीवर दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने व्याज लावण्यात येत आहे. त्यानंतरही नागरी कर भरण्यास तयार नाहीत.

दहा लाख रुपयांपेक्षा अधिक कर थकलेल्या मालमत्ताधारकांची संख्या ६२७ इतकी समोर आली आहे. या मालमत्ताधारकांकडे १४९ कोटी ३४ लाख ६५ हजार ८७९ रुपयांचा कर थकलेला आहे.

वॉर्ड क्र. मालमत्ताधारक थकबाकी (कोटीत) वसुली

एक ०५९ १२,२७,८२,५२४ ३६ लाख

दोन १११ २०,९३,३१,६५९ १० लाख

तीन ०३३ ०८,०८,९८,६६२ ०४ लाख

चार ०२८ ०६,४०,५१,१२५ ०९ लाख

पाच ०७३ २६,७४,९७,८४३ ६१ लाख

सहा ०३० ०६,१६,०४,८६० १६ लाख

सात ०७४ १९,४९,९८,७४३ १२ लाख

आठ १२४ २६,९५,६९,३८६ ५१ लाख

नऊ ०९५ २२,२७,३१,०७७ ०३लाख्

एकूण ६२७ १४९,३४,६५,८७९ ०२ कोटी

Web Title: Abb ... 150 crore owed to 627 property owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.