गटशिक्षणाधिकाऱ्यांवरील अॅट्रॉसिटी, खंडणीचा गुन्हा खोटा
By Admin | Updated: March 4, 2016 00:07 IST2016-03-04T00:04:49+5:302016-03-04T00:07:53+5:30
हदगाव : येथील गटशिक्षणाधिकारी बी़वाय़ येरपुलवार यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटी व खंडणीचा गुन्हा खोटा असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला.

गटशिक्षणाधिकाऱ्यांवरील अॅट्रॉसिटी, खंडणीचा गुन्हा खोटा
हदगाव : येथील गटशिक्षणाधिकारी बी़वाय़ येरपुलवार यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटी व खंडणीचा गुन्हा खोटा असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला.
तालुक्यातील उमरी (दर्या) येथे कार्यरत गुणवंत काळे या शिक्षकाला २०१०-२०११ मध्ये खोली बांधकामासाठी ७ लाख ४४ हजार रुपये मिळाले होते़ परंतु ज्या कामासाठी पैसे मिळाले ते काम अपूर्ण असून रक्कम मात्र पूर्ण उचल केली होती़ अर्धवट कामे असलेल्या सर्वच शिक्षकांना शिक्षण विभाग नांदेड यांनी ७ सप्टेंबर २०१५ रोजी नोटीस जारी केल्या होत्या़ कामे पूर्ण केल्यामुळे या शिक्षकांची पगारही बंद करण्यात आली होती़
ही नोटीस मला जाणीवपूर्वक दिली व माझी पगारही बंद का केली म्हणून हे शिक्षक गटशिक्षणाधिकारी बी.वाय. येरपूलवार यांच्याकडे चौकशीला गेले होते़ त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. यावेळी येरपूलवार यांनी जातीवाचा शिवीगाळ करुन ५० हजार रुपये खंडणी मागितली, असा आरोप या शिक्षकाने केला व तब्बल २० दिवसानंतर २९ सप्टेंबर २०१५ रोजी हदगाव ठाण्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी व खंडणीचा गुन्हा नोंदविला. नांदेडच्या सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर येरपूलवार यांनी औरंगाबादच्या उच्च न्यायालयात धाव घेतली व अटकपूर्व जामीन मिळविला होता़ त्यानंतर पाच महिने सुनावणी झाली़ या निकालामुळे न्याय व्यवस्थेवरील माझा विश्वास वाढला. तसा प्रकार घडलाच नव्हता तरीही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. यामुळे मला मानसिक त्रास झाला़ समाजामध्ये माझी बदनामीही झाल्याची भावना येरपूलवार यांनी यानिमित्ताने व्यक्त केली. (वार्ताहर)
निकालात खंडपीठाने म्हटले की, शिक्षण विभाग (प्राथमिक) नांदेड यांनी नोटीस दिली होती़ त्यामुळे गटशिक्षणाधिकारी यांचा संबंध येत नाही़ जे दोन साक्षीदार फिर्यादीने कोर्टापुढे उभे केले त्याचा या विभागाशी काहीही संबंध नाही़ हे प्रकरण कार्यालयात झाल्यामुळे तेथील कर्मचारीच साक्षीदार होऊ शकतात़ पण कर्मचारी साक्षीदार नव्हते़ ज्या कारणासाठी संबंधित शिक्षकाला नोटीस दिली ते कारणही सत्य होते व इतर शिक्षकाच्याही पगारी बंद करण्यात आल्या होत्या व काम पूर्ण होताच पुन्हा सुरू करण्यात आल्या़ त्यामुळे खंडणी मागण्याचा विषयही सत्य वाटत नाही़यामुळे बी़आय़ येरपुलवार यांना निर्दोष करार देण्यात आला असून हा गुन्हा जाणीवपूर्वक उर्वरित काम करायला लावू नये व दबाव तंत्राचा वापर करण्याचा हा प्रकार आहे.