शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव जीपने दुचाकीला उडवले; पती-पत्नीचा मृत्यू, दीड महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 12:29 IST

पती जागीच ठार झाला तर पत्नीचा उपचार दरम्यान मृत्यू असून जीपमधील अन्य एक महिला गंभीर जखमी आहे

सिल्लोड (औरंगाबाद) : तालुक्यातील पारोळा- डोईफोडा फाट्यावर भरधाव जीपने दुचाकीवरील दाम्पत्यास चिरडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नीचा औरंगाबाद येथे आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्गाबाई व सागर ईश्वर सपकाळ ( २७ , रा. बोदवड ता.सिल्लोड) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. दरम्यान, जीपमधील सुनीता मूनसिंग सीसोरिया ( रा.खातळगड जि. बऱ्हाणपूर ) या देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

सागर सपकाळ व  दुर्गाबाई हे पती-पत्नी दुचाकीवरून (एमएच- २०, सीजी- ४५८७) सिल्लोड कडून कन्नडकडे जात होते. तर देऊळगाव बाजारकडून एक जीप (एमएच- १४, ४६८७) सिल्लोडकडे जात होती. पिरोळा- डोईफोड़ा फाट्याजवळ भरधाव वेगातील जीपने सपकाळ दाम्पत्याच्या दुचाकीला उडवले. यात सागर सपकाळ जागीच ठार झाले. तर पत्नी दुर्गाबाई सपकाळ गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना  तात्काळ नागरिकांनी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचा अक्षरशः  चुराडा झाला. धडकेनंतर जीप रस्त्याच्या खाली उतरून शेजारील शेतात गेली. या अपघाताची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दीड महिन्यापूर्वीच झाले होते लग्न....सागर व दुर्गाबाई यांचे अवघ्या दीड महिन्यापूर्वी लग्न झाले होते. पतीपत्नी म्हणून नवीन जीवनाची त्यांनी केली. मात्र, काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ,बहिण असा परिवार आहे. सागर वर मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दुसरीकडे बुधवारी पत्नीचा मृत्यू झाला.यामुळे बोदवड गावावर शोक कळा पसरली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू