शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र कॅबिन असलेला सुरक्षारक्षकच बनला ‘सिडकोचा अधिकारी’; लाच घेताना रंगेहाथ अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:43 IST

भूखंड नोंदणी, चालान देण्याचे काम; दहा वर्षांपासून स्वतंत्र दालन व कपाटदेखील असल्याचे उघड

छत्रपती संभाजीनगर : भूखंड खरेदीची नोंदणी व चालान काढून देण्यासाठी १ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दिलीप रामराव ढाले (५२) याला एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) मंगळवारी दुपारी १ वाजता रंगेहाथ अटक केली. गेल्या दहा वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून असलेल्या ढालेला सिडको कार्यालयात स्वतंत्र खोली, कपाट देऊन थेट ‘महत्त्वाचे’ काम दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

२१ वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांनी तिसगावमध्ये काही दिवसांपूर्वी सिडकोचा भूखंड खरेदी केला होता. त्याची नोंदणी करुन चालान काढण्यासाठी तरुण अनेक दिवसांपासून जळगाव रोडवरील सिडकोच्या मुख्य कार्यालयात चकरा मारत होता. मात्र, सिडकाेच्या अधिकाऱ्यांनी त्याला ढालेला भेटण्यास सांगितले. ढालेने दि. १२ जून रोजी त्याला १ हजार रुपयांची मागणी केली. संतप्त तरुणाने याची थेट एसीबीचे अधिक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. आटोळे यांच्या सूचनेवरून पथकाने खातरजमा केली . एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी सिडको कार्यालयात सापळा रचला. त्यात ढाले १ हजारांची लाच स्वीकारताना अडकला. त्याला अटक करून त्याच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुरक्षारक्षकाकडे अधिकाऱ्याचे काम कसे ?दहा वर्षांपेक्षा अधिक काळ ढाले एकटा मानधनावर सिडको कार्यालयात काम करतो. अन्य अनेक सुरक्षारक्षक बदलले गेले. ढाले मात्र कायम राहिला. त्याला स्वतंत्र छोटे दालन, त्याच्या नावाने असलेले कपाट पाहून एसीबीचे अधिकारीही अवाक झाले. त्या कपाटात अनेक महत्त्वाच्या फाइल, कागदपत्रे होती. त्याची सर्व प्रक्रिया ढालेच पार पाडत होता, हे विशेष. भूखंड, चालानच्या कामासाठी अर्जदारांना त्याच्याकडे का पाठविले जायचे? ढालेवर कोणाचा वरदहस्त आहे? याविषयी कारवाईनंतर चांगलेच तर्कवितर्क लावले जात होते. 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीcidcoसिडको लॉटरी