शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

एका उंदराने थांबविला छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा; ९ तास लागले दुरुस्तीसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 20:02 IST

चक्क पॅनल बॉक्समध्ये घुसले उंदीर मामा

छत्रपती संभाजीनगर : फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील विजेच्या पॅनल बॉक्समध्ये पहाटे ४:३० वाजता उंदीर मामा घुसले. त्यामुळे पॅनल बॉक्समधील केबल जळाली. ट्रान्सफाॅर्मर ट्रिप झाले. दुरुस्तीसाठी महापालिकेला तब्बल नऊ तास लागले. दुपारी १ वाजता पाणीपुरवठा सुरू केला. शहरात पाणी येण्यासाठी सायंकाळचे ६ वाजले. त्यामुळे ज्या नागरिकांना शुक्रवारी, शनिवारी पाणी मिळणार होते, ते पाण्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आले.

बुधवारपासून शहर आणि परिसराला वादळवाऱ्याचा तडाखा सहन करावा लागतोय. या वादळवाऱ्यामुळे कधी जायकवाडी तर कधी फारोळ्यातील विद्युत पुरवठा खंडित होतोय. १५ ते २० मिनिटेही विद्युत पुरवठा खंडित झाल्यास शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतोय. शहरातील पाण्याचे टप्पे अगोदरच विस्कळीत झालेले असताना शुक्रवारी पहाटे फारोळ्यात पॅनल बॉक्समध्ये उंदीरमामा शिरले. त्यामुळे ठिणग्या उडून विद्युत पुरवठा खंडित झाला. मनपाच्या यांत्रिकी विभागाने फॉल्ट शोधायला सुरुवात केली. सकाळी ९ वाजता एका पॅनल बॉक्समध्ये उंदीर शिरल्याचे निदर्शनास आले. उंदीर काढून स्प्रे करून विद्युत यंत्रणा सुरू केली. ट्रान्सफाॅर्मरमधून थोडा धूर निघाला. ट्रान्सफॉर्मर ‘ट्रिप’ झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू केली. दुपारी १ वाजता विद्युत पुरवठा सुरू झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.

एक दिवस उशिराने पाणीपाणीपुरवठ्याच्या वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले की, ज्या वसाहतींना सहाव्या दिवशी पाणी द्यायचे होते, त्यांना आता आठव्या दिवशी पाणी मिळत आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, रात्री उशिरापर्यंत काही वसाहतींना पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. किमान एक दिवस शहराचा पाणीपुरवठा पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नाही.

फारोळ्यात उंदीर, साप नाहीतफारोळा जलशुद्धीकरण केंद्रात कधीही उंदीर, साप घुसत नाहीत. हा प्रकार नेहमी जायकवाडी पाणी उपसा केंद्रात होतो. दोन्ही ठिकाणी उंदीर येऊ नयेत, म्हणून उपाययोजना केल्या आहेत. नेमका उंदीर आला कुठून, हे लक्षात येत नसल्याचे दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका