शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पतीशी नातेसंबंध नसलेल्याविरुद्ध ‘कलम ४९८’ खाली गुन्हा होऊ शकत नाही: खंडपीठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 14:08 IST

एका विवाहितेच्या तक्रारीवरून तिचा पती व त्याच्या मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.वाचा काय आहे प्रकरण

छत्रपती संभाजीनगर : प्रतिवादीच्या पतीशी नातेसंबंध नसल्यामुळे याचिकाकर्तीविरुद्ध भादंवि कलम ४९८-अ अन्वये दाखल झालेल्या शारीरिक व मानसिक छळाचा प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) आणि त्यातून पुढे न्यायालयात प्रलंबित असलेली कारवाई रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी दिला आहे.

आरोपी पतीसोबत नातेसंबंध नसलेली व्यक्ती, इतकेच नव्हे तर पतीची मैत्रीण (गर्ल फ्रेन्ड) अथवा जिच्यासोबत पतीचे कथित अनैतिक संबंध आहेत, अशा महिलेला भादंवि कलम ४९८-अ अन्वये दाखल झालेल्या ‘विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळा’च्या गुन्ह्यात आरोपी करता येत नाही. मूळ आरोपी व याचिकाकर्ती यांचा विवाह झाल्याचा कोणताही पुरावा रेकॉर्डवर नसल्यामुळे कायद्यातील मूलभूत तत्त्वाचा उल्लेख करीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

काय होती याचिका?छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलिस ठाण्यात एका विवाहितेच्या तक्रारीवरून तिचा पती व त्याच्या मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. विवाहितेने फिर्यादीत म्हटले होते की, तिच्या पतीने त्याच्या मैत्रिणीबरोबर चोरून विवाह केला आहे. फिर्यादीस तिचा पती दुचाकी घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये आणण्यासाठी नेहमीच त्रास देत होता. या पैशासाठी पती व त्याची मैत्रीण फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाणही करत होते. पैसे न दिल्यामुळे पतीने व त्याच्या मैत्रिणीने फिर्यादीला घराबाहेर काढून दिले. या तक्रारीवरून फिर्यादीचा पती व त्याची मैत्रीण यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४९८-अ नुसार (विवाहित महिलेवर पती किंवा नातेवाइक यांनी क्रूरता करणे) या कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा रद्द करावा म्हणून अर्जदार महिलेने ॲड. सुदर्शन साळुंके यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCrime Newsगुन्हेगारी