शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गल्ली ते दिल्ली महायुतीचे सरकार; छत्रपती संभाजीनगरचा सर्वांगीण विकास वेगाने होणारच: राजेंद्र जंजाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 20:23 IST

शहरासाठी जे काही चांगलं असेल ते शंभर टक्के केले जाणार

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर ते दिल्लीपर्यत आता महायुतीचे सरकार आहे. पहिल्यांदाच शहरवासीयांनी महायुतीला मोठा कौल दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वागीण विकास केला जाईल. शहरासाठी जे काही चांगलं असेल ते शंभर टक्के केले जाणार असल्याचा विश्वास नवनिर्वाचित उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.

प्रश्न - शहराला अजूनही मूलभूत सोयी-सुविधांचीच कमतरता, याचे कारण?जंजाळ - रस्ते, पाणी, ड्रेनेजचा प्रश्न जवळपास सुटत आला आहे. २०५० पर्यंत शहराला पाणीप्रश्न अजिबात भेडसावणार नाही. आज जरी शहरवासीयांना त्रास होत असला तरी भविष्यात दररोज मुबलक पाणी मिळेल. वर्षभरात शहर स्वच्छ व सुंदर होईल. देशातील टॉप टेन शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश होईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत केली जाईल.

प्रश्न - पर्यटनाची राजधानी निव्वळ नावालाच आहे, सुविधांचे काय?जंजाळ - राज्याच्या पर्यटनाची राजधानी म्हणून या ऐतिहासिक शहराची ओळख जगभर आहे. पर्यटकांचा ओघ वाढला पाहिजे यासाठी महापालिका म्हणून जे काही करता येईल, ते केले जाईल. पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शहराची मार्केटिंग जगभर केली जाणार आहे.

प्रश्न - महापालिकेतील बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर तुमचे मत काय ?जंजाळ - महापालिका आर्थिकदृष्ट्या कशी सुधारेल यावर अगोदर भर दिला जाईल. नागरिकांना किरकोळ कामासाठी वॉर्ड कार्यालय, मुख्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. जन्म-मृत्यू, बांधकाम परवानगी आदी अनेक नागरी सोयी सुविधा शंभर टक्के ऑनलाईन केल्या जातील. त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच राहणार नाही. कर लावणे, पाणीपट्टी आदी सर्व बाबी ऑनलाईन असतील.

प्रश्न - पाकिंग, फेरीवाल्यांचे प्रश्न सुटतील का?जंजाळ - नवीन विकास आराखड्यानुसार शहरात ठिकठिकाणी पार्किंगसाठी आरक्षण टाकले आहेत. त्या जागांचे भूसंपादन करून पार्किंगची सुविधा देण्यात येईल. फेरीवाल्यांना जागा निश्चित करू. त्यासाठी सर्वसाधारण सभा धोरणात्मक निर्णय घेणार आहे.

प्रश्न - केंद्र, राज्याकडून मुबलक निधी येईल का?जंजाळ - केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे विकास कामांसाठी निधीची कमतरता राहणार नाही. महापौर समीर राजुरकर यांचाही शहराचा अभ्यास आहे. दोघे मिळून विकास कामांचे निर्णय झटपट घेऊ. शासन भरभरून द्यायला तयार आहे, आपल्या घेण्याचीही तेवढीच तयारी असायला हवी.

English
हिंदी सारांश
Web Title : Grand Alliance Government: Aurangabad's Comprehensive Development to Accelerate, says Rajendra Janjal.

Web Summary : Aurangabad's Deputy Mayor, Rajendra Janjal, assures comprehensive development under the Grand Alliance government. Addressing infrastructure gaps, he envisions improved water supply, sanitation, and enhanced tourism. Janjal commits to online services to curb corruption and promises solutions for parking and street vendor issues, securing ample funds from the central and state governments.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMunicipal Corporationनगर पालिका