शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

चांगली सुरुवात; डीएमआयसीमध्ये २७ उद्योगांची ५०० कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 3:00 PM

महाएक्स्पोच्या उद्घाटन समारंभात उद्योगमंत्र्यांच्या हस्ते तीन उद्योगांना भूखंडाचे पत्र

औरंगाबाद : दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक वसाहतँत २७ उद्योजकांनी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून या उद्योगांमुळे थेट १५०० जणांना रोजगार मिळणार आहे, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथील ऑरिकसिटीत आयोजित महाएक्स्पोच्या उद्घाटन समारंभात गुरुवारी केली.

यातील तीन उद्योगांना भूखंड वाटपाचे पत्र उद्योगमंत्री उदय सामंत आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. सामंत म्हणाले की, ऑरिक सिटीच्या दिल्ली,मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरअंतर्गत बिडकीन आणि शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात सुमारे दहा हजार एकर जमीन उपलब्ध आहे. सेव्हन स्टार औद्योगिक सुविधांसह एवढी मोठी जमीन उपलब्ध असलेली देशातील पहिली औद्याेगिक वसाहत आहे. येथे जास्तीत जास्त उद्योगांनी गुंतवणूक करावी, यासाठी ऑरिक सिटी, उद्योग विभाग आणि स्थानिक उद्योजकांच्या संघटना प्रयत्न करीत असतात. या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. २७ उद्योगांनी सुमारे ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक येथे केली आहे. 

या उद्योगांमुळे सुमारे पंधराशे जणांना थेट रोजगार मिळणार आहे. डीएमआयसीमध्ये भूखंड घेणाऱ्या संगीता भास्कर आहेर, एस.के. इंजिनिअरिंगच्या संतोष कडदे आणि प्राईम ॲक्रा क्राफ्टचे गंगा डोंगरे यांना उद्योगमंत्री सामंत, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि पालकमंत्री संदीपान भूमरे यांच्या हस्ते भूखंड वाटप (प्लॉट अलॉटमेंट लेटर) प्रपत्र प्रदान करण्यात आले.

उद्योजकांचा हिरमोडमसिआच्या महाएक्स्पोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार होते. मात्र पंतप्रधान ऑनलाइन आले नाही. तर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण पुढे करीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याने उद्योजकांचा हिरमोड झाला. उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी नंतर व्हिडीओ कॉन्फरन्सच्याद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :DMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरAurangabadऔरंगाबाद