शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१ कोटींच्या कामाचे बिल देण्यासाठी ६० हजारांची लाच; अतिरिक्त आयुक्तांचा स्वीय सहायक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 12:06 IST

जी-२० परिषदेच्या निमित्ताने केलेल्या १ कोटींच्या कामाचे बिल देण्यासाठी घेतली ६० हजारांची लाच

छत्रपती संभाजीनगर : जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहराला स्वच्छ-सुंदर करणाऱ्या ठेकेदाराचे १ कोटी १३ लाख रुपयांचे बिल अदा करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच ‘पंटर’च्या ‘फोन पे’वर स्वीकारणाऱ्या मनपातील स्टेनोग्राफरला शुक्रवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

मनोज सुभाष मारवाडी (२९, रा. विवेकानंदनगर, टी.व्ही. सेंटर), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. लाचेची रक्कम ‘फोन पे’वर घेणारा महेंद्र कदम पाटील हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. एसीबीकडून प्राप्त माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदाराने जी-२० परिषदेसाठी शहरातील पूल, भिंती यांची रंगरंगोटी करण्यासाठी मनपाच्या झोन क्रमांक २, ३ आणि ५ अंतर्गत कामे केली होती. या कामांचे १ कोटी १३ लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी त्यांनी अतिरिक्त आयुक्तांचा स्वीय सहायक मनोज मारवाडी याची भेट घेतली. तेव्हा त्याने ६१ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, उपअधीक्षक दिलीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दुसऱ्या दिवशी सापळा रचला. मात्र, त्याने ही रक्कम १ जून रोजी महेंद्र कदम या त्याच्या पंटरच्या ‘फोन पे’वर पाठविण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी कदमच्या ‘फोन पे’ खात्यात ऑनलाइन ६० हजार रुपये पाठविले.

...अन् अन्य संशयित झाले सावधमहापालिकेत लाच घेतल्याशिवाय कोणतेही बिल अदा केले जात नाही, असे तक्रारदारास कुणीतरी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी ही बाब एसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितली. तेव्हा जे जे लाचेची मागणी करतील, त्यांना पकडण्याचे नियोजन त्यांनी केले. त्यानुसार पहिल्या आरोपीला लाचेची रक्कम १ जून रोजी पाठविल्यानंतरही एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यास अटक केली नव्हती. मात्र, नंतर सर्व संशयित अधिकारी, कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यातील काही जण रजेवर गेले. शेवटी शुक्रवारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवून मारवाडी यास अटक केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका