शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

५ वर्षांत ९८ जणांचे देहदान; घाटी रुग्णालय ऋणनिर्देश सोहळ्यात मानणार त्यांच्या कुटूंबियांचे आभार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 7:12 PM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील(घाटी) शरीररचनाशास्त्र विभागामध्ये देहदानाचे प्रमाण वाढत असून पाच वर्षापूर्वी वर्षभरात १२ ते १४ मृतदेहांचे दान केले जात होते. हे प्रमाण आता वर्षाला २७ पर्यंत आले आहे. गेल्या पाच वर्षात औरंगाबादसह बीड, जालना येथून ९८ देहदान झाले. 

ठळक मुद्देविविध माध्यमातून होणा-या जनजागृतीमुळे  देहदानात वाढ होत असून ही संककल्पना समाजात हळूहळू रुजी लागली आहे. देहदानात वाढ झाली असून  वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान करणा-यांच्या कुटुंबियांचा शरीररचनाशास्त्र विभागातर्फे शनिवारी (दि. १८) घाटी रुग्णालयात ऋणनिर्देश सोहळा आयोजित केला आहे.

औरंगाबाद : 'मरावे परी कीर्तीरुपी उरावे' या उक्तीप्रमाणे देहदान  करून समाजासमोर एक आदर्श ठेवला जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील(घाटी) शरीररचनाशास्त्र विभागामध्ये देहदानाचे प्रमाण वाढत असून पाच वर्षापूर्वी वर्षभरात १२ ते १४ मृतदेहांचे दान केले जात होते. हे प्रमाण आता वर्षाला २७ पर्यंत आले आहे. गेल्या पाच वर्षात औरंगाबादसह बीड, जालना येथून ९८ देहदान झाले. 

एका व्यक्तीच्या देहदानामुळे उद्याचे शेकडो डॉक्टर घडत आहेत. विविध माध्यमातून होणा-या जनजागृतीमुळे  देहदानात वाढ होत असून ही संककल्पना समाजात हळूहळू रुजी लागली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील(घाटी) येथे विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यात येते. एमबीबीएस, बीडीएस आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वर्षाला किमान २० मानवी मृतदेहांची आवश्यकता असते. समाजामध्ये देहदानाविषयी जनजागृती होण्यासाठी घाटीतील शरीररचनाशास्त्र विभागाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येतात. देहदानाविषयी अंधश्रद्धा दूर करून त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि देहदान करणाºया व्यक्तींना मदत करण्यासाठी एक समिती कार्यरत आहे. परिणामी, मागील काही वर्षांत देहदानाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. रासायनिक प्रक्रियेनंतर हे मृतदेह अनेक वर्षे वैद्यकीय शिक्षणात महत्वाची भूमिका बजावत आहे. पाच वर्षाच्या चिमुकल्याचे देहदान मोठ्या व्यक्तींचे देहदान नियमित होतात. परंतु लहान मुलांचे देहदान क्वचितच घडते. गतवर्षी पाचवर्षीय चिमुकल्याचे देहदान वैद्यकीय इतिहासात आणि वैद्यकीय शिक्षणासाठी, संशोधनासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरले. 

कुटुंबियांचे ऋणनिर्देशदेहदानात वाढ झाली असून  वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान करणा-यांच्या कुटुंबियांचा शरीररचनाशास्त्र विभागातर्फे शनिवारी (दि. १८) घाटी रुग्णालयात ऋणनिर्देश सोहळा आयोजित केला आहे. यातून त्यांचे ऋण व्यक्त करण्यात येईल.-डॉ. शिवाजी सुक्रे,उपअधिष्ठाता तथाविभागप्रमुख,शरीररचनाशास्त्र, घाटी

वर्ष               देहदान

२००६     २०

२००७    २८ 

२००८    २५ 

२००९    १४ 

२०१०     १२ 

२०११      १४ 

२०१२      १२ 

२०१३         ११२०१४          २०२०१५          १८२०१६           २७२०१७           २२ 

टॅग्स :Healthआरोग्य