९६ हजार नागरिकांना मिळणार प्रमाणपत्र
By Admin | Updated: May 14, 2014 01:06 IST2014-05-14T00:59:32+5:302014-05-14T01:06:13+5:30
रेणापूर : रेणापूर सेतू सुविधा केंद्रातून २०१३-१४ या वर्षात एकूण ८१ हजार सातबारा तर १५ हजारावर विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

९६ हजार नागरिकांना मिळणार प्रमाणपत्र
रेणापूर : रेणापूर सेतू सुविधा केंद्रातून २०१३-१४ या वर्षात एकूण ८१ हजार सातबारा तर १५ हजारावर विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून येत्या शैक्षणिक वर्षात लागणारी विविध प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी सेतू केंद्राकडे प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे. सातबारा वितरणात रेणापूर तालुका जिल्ह्यात आघाडीवर आहे. रेणापूरच्या सेतू केंद्रातून सर्वसामान्यांना व शिक्षणासाठी जी विविध प्रमाणपत्रे वितरित केली जातात. शिवाय शेतकर्यांना लागणारे सात-बारा, आठ अ उतारा सेतू केंद्रामार्फत दिला जातो. सन २०१४-१४ या वर्षात रेणापूरच्या सेतू केंद्रातून जातीची व इतर विविध प्रमाणपत्रे वितरित करून जिल्ह्यात या सेतू केंद्राने आघाडी मिळविली. शिवाय सातबारा व आठ अ उतारा वाटप करणारे जिल्ह्यातील रेणापूरचे सेतू केंद्र आघाडीवर राहिले. सातबारा, आठ - अ- ८१ हजार ८१७ वाटप करून रेणापूर सेतू केंद्र जिल्ह्यात सर्वाधिक सात-बारा, आठ-अ वितरित करणारे सेतू केंद्र ठरले. प्रतिवर्षी सेतू केंद्रातून शिक्षणासाठी लागणारी जातीची प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, वय अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असतात. पाल्यांची वरील प्रमाणपत्र काढण्यासाठी ऐनवेळी पालक सेतू केंद्राकडे धाव घेतात. त्यामुळे सेतू केंद्रात एकच गर्दी होते. त्यात सेतू केंद्रातील कर्मचार्यांना त्रास तर होतोच; शिवाय पालकांची ही मोठी गैरसोय होऊन त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत. या गोष्टी टाळण्यासाठी तालुक्यातील पाल्यांनी आतापासूनच प्रमाणपत्र काढण्यासाठी सेतू केंद्राकडे प्रस्ताव सादर करावेत जेणेकरून शाळा सुरू होण्यापूर्वी पाल्यांना प्रमाणपत्र घेऊन शाळेत प्रवेश मिळणे सोयीस्कर होईल, असे आवाहन तहसीलदार संजय वारकड, सेतूचे व्यवस्थापक ज्ञानोबा कांबळे यांनी केले आहे. (वार्ताहर)