९४ ग्रा.पं. चे लेखापरीक्षणच नाही
By Admin | Updated: June 16, 2017 23:23 IST2017-06-16T23:22:27+5:302017-06-16T23:23:36+5:30
हिंगोली : शासनाने लेखा परीक्षण झाल्याशिवाय ग्रामपंचायतींना वित्त आयोगाचा निधी देवू नये, असे निर्देश दिल्यानंतरही ९४ ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण अद्यापही झाले नसल्याचे समोर येत आहे.

९४ ग्रा.पं. चे लेखापरीक्षणच नाही
हिंगोली : शासनाने लेखा परीक्षण झाल्याशिवाय ग्रामपंचायतींना वित्त आयोगाचा निधी देवू नये, असे निर्देश दिल्यानंतरही ९४ ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण अद्यापही झाले नसल्याचे समोर येत आहे. या ग्रामपंचायतींचे दस्तावेज सापडत नसल्याचे समोर येत आहे.
ग्रामपंचायतींच्या कारभारात सुधारणा व्हावी, यासाठी शासनाने लेखापरीक्षण करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जवळपास अडीचशे ग्रामपंचायतींचे रखडलेले लेखापरीक्षण पूर्ण करून घेण्यासाठी ग्रा. पं. नी प्रयत्न केले. त्यातून बाहेर पडलेल्या ग्रामपंचायती वगळल्या तरीही ९४ ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण अद्याप बाकीच आहे. त्यातही तुरळक ग्रामपंचायतींचेच एका वर्षाचे लेखापरीक्षण राहिले. अनेक ग्रा.पं.नी ५ ते ६ वर्षांचे लेखापरीक्षण केलेले नाही. लेखा परीक्षक मात्र यामुळे वेळापत्रक ठरवून हैराण होतात. याशिवाय स्थानिक निधी लेखा कार्यालयात परीक्षकांची अपुरी संख्या अन् रिक्त पदे यामुळे २00७-0८ ते २0१४-१५ पर्यंतचेच लेखा परीक्षण झालेले आहे. मागील दोन वर्षांच्या लेखा परीक्षणासाठी लवकरच नवे वेळापत्रक जारी होणार आहे. ५६५ ग्रामपंचायतींची संख्या असल्याने ५ ते ७ परीक्षकांसाठी ही वेळखाऊ प्रक्रिया ठरत आहे. लेखा परीक्षण राहिलेल्या ग्रामपंचायतींमध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी, मेथा, नांदखेडा, जोडपिंप्री, सावळी खु., सावरखेडा, आसोंदा, पांगरा त.लाख, हिवरखेडा, सुरवाडी, दरेगाव, गढाळा, कोंडशी, जडगाव, लक्ष्मण नाईक तांडा, लोहरा बु., बेरुळा, लोहरा खु., निशाना, येडूत, वसमत तालुक्यातील गुंडा, आडगाव, कळंबा, दाभाडी, हयातनगर, कोनाथा, सेलू, रांजोना, कानोसा, एकुरखा, पुयनी खु., दारेफळ, करंजाळा, लोळेश्वर, डोणवाडा, रायवाडी, कुपटी, पुयनी बु., पारवा, वीरेगाव, हट्टा, रोडगा, सेनगाव तालुक्यातील खडकी, धनगरवाडी, खुडज, पळशी, सवना, सिनगी नागा, जांभरुण रोडगे, बोरखेडी जी., धानोरा ज., देवूळगाव ज., आजेगाव, माझोड, रिधोरा, कारेगाव, आडोळ, पार्डी पो., पिंपरी लिंग, जमदया, सुलदली, सालेगावे, वाघजाळी, चोंढी खु., हिवरखेडा, वरूड चक्रपान, खैरखेडा, बाभूळगाव, हिंगोली तालुक्यातील बासंबा, बोडखी, राहुली खु., कनका, बळसोंड, अंधारवाडी, कलगाव, हिंगणी, कानडखेडा खु., कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ, तोंडापूर, दाती, घोडा, जरोडा, हारवाडी, बोथी, सांडस, वरूड, बाभळी, कांडली, रेडगाव, पाळोदी, काळ्याची वाडी, भोसी, जवळा पां, येलकी या गावांचा समावेश आहे.