जिल्हा परिषदेत बदल्यांसाठी ९४८ अर्ज

By Admin | Updated: May 20, 2015 00:19 IST2015-05-20T00:06:34+5:302015-05-20T00:19:11+5:30

लातूर : लातूर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याच्या बदल्यासाठी विकल्प सादर करण्यात आले असून त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सर्व विभागातील प्रशासकीय

9 48 application for transfer to Zilla Parishad | जिल्हा परिषदेत बदल्यांसाठी ९४८ अर्ज

जिल्हा परिषदेत बदल्यांसाठी ९४८ अर्ज


लातूर : लातूर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याच्या बदल्यासाठी विकल्प सादर करण्यात आले असून त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सर्व विभागातील प्रशासकीय, विनंती आणि आपसी बदलीसाठी ९३४ अर्ज आले आहेत़ ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीयस्तरावरील बदल्या होणार नाहीत़ शिक्षकाच्या केवळ आपसी बदल्या होणार आहेत़
लातूर जिल्हा परिषदेत सध्या बदल्याचे वारे जोरात सुरू आहेत़ या बदल्यासाठी प्रशासकीय बदल्यासाठी १० वर्ष तर विनंती बदल्यासाठी ५ वर्ष ज्यांनी पूर्ण केले तसेच आपसी बदल्यासाठी अशा सर्व कर्मचाऱ्यांनी विकल्प ५ मे पर्यंत सादर केले आहेत़ आता बदल्यांचा मुहूर्त २१ ते २५ मेचा असल्याने त्याच्या कडे सगळ्याचे लक्ष लागले आहे़ जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाचे अर्ज जरी ३८२ आले असले तरी या सर्व विभागातील प्रशासकीय बदल्या १० टक्क्यानुसार ८२ व विनंती बदल्या १० टक्क्यानुसार १४३ अशा एकूण २२५ जागेवर बदल्या होणार आहेत़ सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्याचे ८५ अर्ज आले आहेत़ तर पंचायत विभागातील ४७, कृषी विभागातील ७ ,बांधकाम विभाग ७, आरोग्य विभागातील सुमारे ५५२ अर्ज आले आहेत़ लघुपाठबंधारे विभाग ७, पशुसंवर्धन विभाग ७ , महिला व बालकल्याण ७, शिक्षण विभाग २१४, अर्थ विभाग ८ अशा सर्व विभागातील ९४८ अर्जांचा पाऊसच पडला आहे़
जिल्हा परिषदेतील बदल्यांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे़ त्यानुसार २१ ते २५ मे या कालावधीत बदल्या होणार आहे़ शिक्षक, आरोग्य, पंचायत विभागातील प्रशासकीय बदल्या स्थगिती असून त्यांच्या केवळ आपसी बदल्याच होणार आहेत़
शिक्षण विभागातील बदल्यांना राज्यशासनाकडून स्थगिती मिळाली आहे़ तसे पत्रही जि़प़प्रशासनाला मिळाले आहे़
त्यामुळे या विभागातील बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे, असे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी सांगितले़
जिल्हा परिषदेत बदल्याचे वारे वाहत असले तरी आरोग्य, पंचायत विभाग तसेच शिक्षकांच्या बदल्याबाबत शासनाकडूनच बे्रक लावला आहे़ पंचायत विभागातील तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी १५ मे २०१४ नुसारच प्रशासकीय बदल्या करु नयेत असे आदेश दिले आहेत़ तर शिक्षण विभागातील बदल्याबाबत ग्रामविकास व जल संधारण विभागाने १८ मे रोजी शासनादेश काढून प्रशासकीय व आंतर जिल्हा बदल्याना ब्रेक लावला आहे़ ज्या जिल्हा परिषदांतर्गत शिक्षकांच्या आपसी बदल्या व्यतिरिक्त जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा बदल्या झाल्यास असल्यास सदर बदल्या स्थगित करण्यात याव्यात असे आदेश दिले आहे़ त्यामुळे शासन शिक्षकांच्या आता केवळ आपसी बदल्याच होणार आहे़

Web Title: 9 48 application for transfer to Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.