लोकअदालतीत ९४५ प्रकरणे निकाली

By Admin | Updated: April 12, 2015 00:49 IST2015-04-12T00:49:01+5:302015-04-12T00:49:01+5:30

जालना : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये शनिवारी एकूण २१०५ पैकी ९४५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

9 45 cases were filed in public | लोकअदालतीत ९४५ प्रकरणे निकाली

लोकअदालतीत ९४५ प्रकरणे निकाली


जालना : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये शनिवारी एकूण २१०५ पैकी ९४५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधिश रा.वि. देशमुख होते. यावेळी उदघाटक म्हणून जिल्हा वकील संघाचे सदस्य अ‍ॅड. किशोर चिटणीस, एन.डी. शेळके, एन.के. कोहिरे, आर.आर. केंधळे, अ‍ॅड. कल्पना त्रिभुवन, वकील संघाचे अध्यक्ष एस.ए. तारेख, जिल्हा न्यायाधिश - १ ए.एन. करमरकर, अनघा रोट्टे, निरंजन नाईकवाडे, एफ.एम. ख्वाजा, राजश्री परदेशी, व्ही.एस. देशपांडे, सत्यशिला कटारे, एस.बी. जोशी, मुंगिलवार, जिल्हा सरकारी वकील मुकुंद कोल्हे, बलवंत नाईक, सी.पी. शेळके, व्ही.डी. बडे, अमजद अली, रामेश्वर गव्हाणे, काळे, आर.एस. देशमुख, सी.डी. देशपांडे, एस.एस. तवरावाला,जे.सी. बडवे, एस.एम. कुलकर्णी, ओहोळ, जे.एस. भुतेकर, अरविंद मुरमे, डी.के. कुलकर्णी, पठाण, शेलगावकर, मनोरमा तिडके, सुबोध किनगावकर, बी.के. खांडेकर, दीपक कोल्हे आदींची उपस्थिती होती.
या अदालतीत एल.ए. आर. दरखास्त प्रकरणे १७, महसूल प्रकरणे १७, मोटार अपघात नुकसान भरपाई ७, कलम १३८ ची ६६, दिवाणी प्रकरणे ५४, फौजदारी ९७, कौटुंबिक वाद प्रकरणे ९४, मोटार वाहन कायदा एन.सी. ४९२, दावा दाखलपूर्व बँक व विविध मोबाईल कंपन्यांची २७ अशी एकूण ९४५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
कार्यक्रमाची सुरूवात अत्यंत साध्या पद्धतीने दीपप्रज्वलन करून झाली. सूत्रसंचालन निरंजन नाईकवाडे यांनी केले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्राधिकरणाचे अधीक्षक बी.पी. पांचाळ, व.ली. बेळीकर, दाभाडकर, महेश कुलकर्णी, गडदे आदींनी प्रयत्न केले.

Web Title: 9 45 cases were filed in public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.