२१ ग्रामपंचायतींसाठी ८५ टक्के मतदान
By Admin | Updated: October 29, 2015 00:24 IST2015-10-29T00:11:04+5:302015-10-29T00:24:13+5:30
बीड : जिल्हयातील सहा तालुक्यांतील २१ ग्राम पंचायतीचे मतदान बुधवारी शांततेत पार पडले. एकूण ८५ टक्के मतदान पूर्ण झाले असल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

२१ ग्रामपंचायतींसाठी ८५ टक्के मतदान
बीड : जिल्हयातील सहा तालुक्यांतील २१ ग्राम पंचायतीचे मतदान बुधवारी शांततेत पार पडले. एकूण ८५ टक्के मतदान पूर्ण झाले असल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
मतदान प्रक्रीया सकाळी साडेसात वाजता सुरू झाली होती. पोलिस बंदोबस्तात मतदान पार पडले. सकाळी ८ ते दुपारी ४ या दरम्यान मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. टक्केवारीत झालेले मतदान पुढील प्रमाणे. बीड -८५ टक्के, गेवराई ८२, माजलगाव- ८२.८५, केज- ९०.८६, आष्टी- ८७.५ तर धारूर ८२ टक्के मतदान झाले. (प्रतिनिधी)