बायपास व रूंदीकरणावर ८३ आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:42 IST2017-09-12T00:42:48+5:302017-09-12T00:42:48+5:30

शहरातून जाणाºया नांदेड- अकोला या १६१ च्या राष्टÑीय महामार्गाचे रूंदीकरण व कळमनुरी, आखाडा बाळापूरसाठी बायपास होत आहे. यावर ८३ आक्षेप दाखल झाले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दिली.

83 convictions on bypass and width | बायपास व रूंदीकरणावर ८३ आक्षेप

बायपास व रूंदीकरणावर ८३ आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : शहरातून जाणाºया नांदेड- अकोला या १६१ च्या राष्टÑीय महामार्गाचे रूंदीकरण व कळमनुरी, आखाडा बाळापूरसाठी बायपास होत आहे. यावर ८३ आक्षेप दाखल झाले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दिली.
या बायपास व रूंदीकरणात २१ गावच्या जमिनी जात आहेत. यात १५३.७३ हेक्टर जमीन जात आहे. याबाबतचे जाहीर प्रगटन लोकमतमध्ये १८ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध झाले. ७ सप्टेंबरपर्यंत आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानुसार दाती येथील ११, आखाडा बाळापूर ३, माळेगाव ३, कामठा १२, डोंगरगावपूल ५, कळमनुरी १, शिवणी खुर्द ४ असे एकूण ८३ आक्षेप आलेले आहेत. कळमनुरी व आखाडा बाळापूरसाठी बायपास होत आहे. हा आक्षेप आम्ही जमीन देण्यास तयार आहोत मावेजा जास्त द्यावा, आमची जमीन घेवू नका आदी आक्षेप आलेले आहेत. रूंदीकरणात वसपांगरा ते वारंगाफाट्यापर्यंत जमिनी जात आहेत.
या जमीन मोजणीसाठी उपविभागीय कार्यालयाने भूमी अभिलेखकडे ३४ लाख ३८ हजार रुपये भरले आहेत. २० सप्टेंबरपासून मोजणीला सुरूवातही होणार आहे. आलेल्या आक्षेपावर लवकरच सुनावणी होणार आहे. वसपांगरा येथून मोजणीला सुरूवात होणार आहे.
मोजणी प्रक्रियेला २ महिने लागणार असून, जमीन संपादनासाठी थ्रीडीची अधिसूचना निघणार आहे. जमीन मोजणीनंतर त्याचे बाजारमूल्य काढून नागरिकांना मावेजा दिला जाणार आहे. ही सर्र्व प्रक्रिया ४ ते ५ महिन्यांत होणार आहे.
या राष्टÑीय महामार्गाचे रूंदीकरण झाल्यानंतर व बायपासनंतर विकासाला गती मिळून अपघातही कमी होणार आहेत.

Web Title: 83 convictions on bypass and width

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.