८० सवाऱ्या, तीन डोल्यांची प्रतिष्ठापना

By Admin | Updated: October 12, 2016 23:02 IST2016-10-12T22:21:44+5:302016-10-12T23:02:13+5:30

लोहारा : मोहर्रम सणानिमित्त लोहारा तालुक्यातील विविध गावात एकूण ८० सवाऱ्या (पंजे) व ३ डोल्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

80 rides, installation of three eyes | ८० सवाऱ्या, तीन डोल्यांची प्रतिष्ठापना

८० सवाऱ्या, तीन डोल्यांची प्रतिष्ठापना

लोहारा : मोहर्रम सणानिमित्त लोहारा तालुक्यातील विविध गावात एकूण ८० सवाऱ्या (पंजे) व ३ डोल्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
लोहारा शहर व तालुक्यात बुधवारी मोहर्रम सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी डोल्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. मोघा (बु), मोघा (खु), धानुरी, जेवळी, आरणी, वडगाव (गांजा), पेठसांगवी, हिप्परगा (सय्यद), फणेपूर, सास्तूर आदी ठिकाणी सवाऱ्यांची स्थापना करण्यात आली. तसेच लोहारा, जेवळी व फणेपुर येथे प्रत्येकी एक डोला बसविण्यात आला होता. मिरवणुकीदरम्यान लोहारा येथील कुरेशी मोहल्ला येथील हालीमबी डोल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शहरात ९ आॅक्टोबर रोजी इमाम खासीम ही सवारी सर्वात पहिली उठली. त्यानंतर १३ रोजी सर्वच सवाऱ्या उठवून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या आवारात करबला मैदानात जावून परंपरेनुसार आपापल्या ठिकाणी विसर्जीत होणार आहेत.
हिंदू बांधवांकडून सवारी
४लोहारा : जात, पात, धर्म, भेदभाव याला फाटा देवून मोहरमनिमित्त मौलाला देवताची सवारी बसविण्याची परंपरा शहरातील मारूती कोंडीबा रणदिवे यांनी मागील वीस वर्षांपासून जोपासली आहे. रणदिवे हे मुळचे औसा तालुक्यातील लामजणा जावळी येथील रहिवाशी आहेत. १९८७ साली ते लोहारा येथे स्थायिक झाले. सवारी बसविण्याची वडीलोपर्जित परंपरा त्यांनी लोहारा येथेही सुरू केली. मौलाली सवारी नावाने ही सवारी ओळखली जाते. शनिवारी या सवारीचे विसर्जन केले जाणार आहे. येथे बालाजी रोडगे, प्रकाश थोरात, भाऊ रोडगे, आजमोद्दीन मासुलदार, आयुब मासुलदार यांच्यासह मुस्लीम बांधव मिळून मोहर्रम साजरा करतात.

Web Title: 80 rides, installation of three eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.