७५ वर्षांच्या स्वावलंबी आजींचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:06 IST2021-03-09T04:06:07+5:302021-03-09T04:06:07+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त ६ मार्च रोजी बसय्ये नगर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या पदावर असणाऱ्या ...

७५ वर्षांच्या स्वावलंबी आजींचा सत्कार
जागतिक महिला दिनानिमित्त ६ मार्च रोजी बसय्ये नगर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या पदावर असणाऱ्या महिलांचा सत्कार तर अनेक ठिकाणी केला जातो; पण जेव्हा या आजींसारख्या कष्टकरी महिला घराची जबाबदारी काही कामांच्या रूपात सांभाळतात, तेव्हाच तर उच्चपदस्थ महिलांना त्यांची कामे करणे शक्य होते. म्हणूनच रूक्मिणी फकीरचंद आणि अनसूया तोताराम या कष्टकरी महिलांचा सत्कार करण्यात आला, असे अनंत मोताळे यांनी सांगितले.
जिन्सी पोलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांचा सत्कार झाला. पोलीस उपनिरीक्षक पाटील, डॉ. विजय देशमुख, ॲड. श्रीचंद जिग्यासी, प्रभाकर दिवटे, रोहिणी खैरे, शिवाजी पाथ्रीकर, प्रवीण औटी यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
फोटो ओळ :
सत्कारमूर्तींसह अन्न वाचवा समितीचे सदस्य आणि परिसरातील नागरिक.