शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रनिकेतन महाविद्यालयात पहिल्या फेरीतच ७१ हजार जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 23:53 IST

राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या यादीमध्ये अवघ्या ४३ हजार ७५४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यामुळे तब्बल ७१ हजार ८१ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील एकूण तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये १ लाख १४ हजार ६५५ जागा उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देमिशन अ‍ॅडमिशन : ४३ हजार ७५४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत; रिक्त जागांची टक्केवारी ६२ टक्के

औरंगाबाद : राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या यादीमध्ये अवघ्या ४३ हजार ७५४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यामुळे तब्बल ७१ हजार ८१ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील एकूण तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये १ लाख १४ हजार ६५५ जागा उपलब्ध आहेत.मागील ३ वर्षांपासून तंत्रनिकेतन महाविद्यालयांना घरघर लागली आहे. यावर्षी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आली. या फेरीतील प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील एकूण तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ५३ हजार ३९४ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. यातील ४३ हजार ७५४ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालय बहाल केले आहे. त्यामुळे उपलब्ध जागेच्या ६२ टक्के जागा पहिल्या फेरीअखेर रिक्त राहिल्या आहेत. या फेरीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील ४३ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांत २० हजार २०६ जागा आहेत. यापैकी पहिल्या फेरीत १३ हजार ४४९ जागांवर विद्यार्थी अलॉट केले आहेत. यात ६ हजार ७५७ जागा रिक्त राहिल्या आहेत. अनुदानित तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये २ हजार ७८५ जागा असून, त्यात १ हजार ८३७ विद्यार्थी अलॉट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनुदानितमध्ये ९४८ जागा रिक्त आहेत. खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये ९१ हजार ११२ जागा उपलब्ध आहेत. यापैकी अवघ्या २७ हजार ९८७ जागांवर विद्यार्थी दिले आहेत. खाजगी तंत्रनिकेतनमध्ये रिक्त जागांचा आकडा ६३ हजार १२५ एवढा असून, टक्केवारीमध्ये हा आकडा ६९.२८ टक्के आहे. पहिल्या गुणवत्ता फेरीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना १९ जुलैपर्यंत प्रवेशनिश्चिती करावी लागणार आहे. उपलब्ध जागा आणि प्रवेश होणाऱ्या जागांमध्ये तब्बल ७० हजारपेक्षा अधिकची तफावत राहण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण