शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

मॅरेथॉनमध्ये धावले ७०० आबालवृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:02 AM

सिंधी समाजाचे आराध्य दैवत श्री झुलेलाल भगवान यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. १८) सिंधी समाज व झुलेलाल सेवा समितीतर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३ वर्षांच्या बालकापासून तर ज्येष्ठ अशा सुमारे ७०० महिला-पुरुष, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिंधी समाजाचे आराध्य दैवत श्री झुलेलाल भगवान यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. १८) सिंधी समाज व झुलेलाल सेवा समितीतर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३ वर्षांच्या बालकापासून तर ज्येष्ठ अशा सुमारे ७०० महिला-पुरुष, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.मॅरेथॉनपूर्वी सिंधी कॉलनीतील सोसायटी मैदानात सकाळी ६.३० वाजता वॉर्मअपचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७ वाजता मॅरेथॉनचे उद््घाटन झाले.याप्रसंगी सिंधी समाज अध्यक्ष किशनचंद तनवाणी, कल्याणदास माटरा, मुकुंद भोगले, नितीन घोरपडे, झुलेलाल सेवा समितीचे अध्यक्ष राजू तनवाणी, सचिव भरतलाल निहालानी, उपाध्यक्ष राजू परसवाणी, आनंद दयालानी, शंकरलाल गुनवाणी, विनोद चोटलानी, शंकर बजाज, देशराज (राजा) डेबरा, गिरीश तोलवानी, गौरव केलानी, बबीता परसवाणी, मोना चोटलानी, संजय परसवाणी, राकेश काल्डा आदी उपस्थित होते.सिंधी कॉलनी परिसरात ३ कि.मी. आणि ५ कि.मी. मॅरेथॉन पार पडली. यामध्ये स्पर्धकांनी ३ कि.मी.चे अंतर १३ मिनिटांत, तर ५ कि.मी.चे अंतर २५ मिनिटांत पूर्ण केले.दैनंदिन जीवनात आरोग्यासाठी धावण्याचे पर्यायाने व्यायामाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचावे, यासाठी मॅरेथॉनचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले.श्री झुलेलाल भगवान यांच्या जयंतीनिमित्त १९ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजता श्री झुलेलाल भगवान यांचा पंचामृत स्नान सोहळा, ६.१५ वाजता प्रभात फेरी, ८.३० वाजता सामूहिक आरती, ११ वाजता कंवर कुटियाँ येथून वाहन रॅली काढण्यात येईल.सायंकाळी ६ वाजता शहागंज येथील वरुणदेव जलाश्रम ते सिंधी कॉलनी अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सिंधी महिला ढोल पथक शोभायात्रेचे मुख्य आकर्षक असणार आहे. कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन झुलेलाल सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे.