एका दिवसात मिटविली ७०० प्रकरणे
By Admin | Updated: April 12, 2015 00:57 IST2015-04-12T00:57:21+5:302015-04-12T00:57:21+5:30
उस्मानाबाद : राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून शुक्रवारी एका दिवसात ७०० प्रकरणे मिटविण्यात आली आहेत़

एका दिवसात मिटविली ७०० प्रकरणे
उस्मानाबाद : राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून शुक्रवारी एका दिवसात ७०० प्रकरणे मिटविण्यात आली आहेत़ येत्या तीन दिवसात जास्तीत जास्त प्रकरणे मिटविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांनी सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, जिल्हा विधीज्ञ सेवा प्राधिकरणचे सचिव पी़बी़मोरे, दिवाणी न्यायाधीश व स्तर ओंकार देशमुख, जिल्हा न्यायाधीश-२ एस़आय़पठाण, ग्राहक तक्रार निवारण मंचच्या सदस्या विद्युलता दलभंजन, मुख्य न्यायदंडाधिकारी यु़टी़पोळ, ओ़आऱदेशमुख, दिवाणी न्यायाधीश डॉ़ रचना तेहरा, आय़एम़नाईकवाडी, वाय़ पी़ मनाठकर, जिल्हा सरकारी वकील व्ही़ बी़ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती़
घरातील, कुटुंबातील कर्ता व्यक्ती मृत पावल्याने त्या कुटुंबाचा आधार नष्ट होतो़ बळी पडलेल्या कुटुंबातील व्यक्तींना आधार देणे व सामाजिक स्थैर्य राखण्यासाठी शासनाने नुकसान भरपाई योजना-२०१४ कार्यान्वित केली आहे़ बळी पडलेल्यासाठी शासनाने जिल्ह्यासाठी १६ लाख रूपये मंजूर केले असल्याचेही तावडे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे म्हणाले की, एखाद्या गुन्ह्यामध्ये ज्यांना हानी अथवा इजा पोहोचली असेल अशा व्यक्तींचे पुनर्वसन करणे ही शासनाची जबाबदारी आहे़ बळी पडलेल्यांना व मनोर्धर्य खचलेल्या कुटुंबांना तत्काळ न्याय मिळवून देण्यासाठी विधीज्ञ मंडळांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले़ यावेळी पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी मार्गदर्शन केले़ तर पी़बी़मोरे यांनी योजनेबाबत माहिती दिली़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड़ एम़डी़माढेकर यांनी तर शेवटी दिवाणी न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी आभार मानले़ कार्यक्रमास विधीज्ञ टी़ आऱ वीर, कांता कोकरे, तेजश्री पाटील, सामाजिक कार्यकर्ती आऱडी़माळाळे, विधीज्ञ एस़एऩबादुले, आशा टेळे, विधीज्ञ एस़ ए़ देशपांडे, आऱ एऩ लोखंडे, विधीज्ञ परवेज अहमद, स्मीता गंगावणे, विद्याराणी जाधव, विधीज्ञ पी़एऩलोमटे, सी़जे़ सय्यद यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पक्षकार उपस्थित होते़
सात लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप
या कार्यक्रमात जिल्ह्यात बळी पडलेल्या सात व्यक्तीच्या कुटुंबियांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नुकसानभरपाई धनादेशाचे वाटप करण्यात आले़ या लाभार्थ्यांना १३ लाख, ५९ हजार ९९७ रूपयांची मदत मिळाली आहे़ (प्रतिनिधी)
परंड्यात २४२ प्रकरणे निकाली
४परंडा : तालुका विधि सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा न्यायालायात राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यात २४२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यामध्ये १०८ दिवाणी व १३४ फौजदारी स्वरुपाची प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे. शेतकऱ्यांची सिना-कोळेगाव प्रकल्पांतर्गत येणारी प्रलंबित २८ दिवाणी प्रकरणे मिटविण्यात आली आहेत. सिना-कोळेगाव प्रकल्पांतर्गत प्रकरणे तडजोडीसाठी उपजिल्हाधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी, भूम, कार्यकारी अभियंता सीना-कोळेगाव प्रकल्प विभाग हे यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्टेट बँक आँफ हैद्राबाद व महाराष्ट्र ग्रामीण बँक परंडा यांची दाखलपूर्वची प्रकरणेही या लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्याचे कामकाज न्या. वि. कि. मांडे, (दिवाणी कनिष्ठ स्तर), न्या. उषा वि.इंदापूरे (दिवाणी कनिष्ठ स्तर) व के.बी.चौगुले सहदिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर यांनी पाहिले.