७० लाखांचा अपहार
By Admin | Updated: January 23, 2015 00:54 IST2015-01-23T00:33:42+5:302015-01-23T00:54:54+5:30
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील वैष्णोदेवी फूड प्रोडक्टस्च्या बॉयलर विभागात ७० लाख, ५८ हजार ६८८ रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी सहा जणाविरूध्द

७० लाखांचा अपहार
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील वैष्णोदेवी फूड प्रोडक्टस्च्या बॉयलर विभागात ७० लाख, ५८ हजार ६८८ रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी सहा जणाविरूध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना ९ एप्रिल २०१२ ते १४ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत घडली़
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील वैष्णोदेवी फूड प्रोडक्टस्चे अंतर्गत लेखा परिक्षक महंमद शफीक नसीर बागवान यांनी १५ आॅगस्ट २०१४ पर्यंतचे लेखा परिक्षण केले होते़ या परिक्षणादरम्यान संदीप महादेव जळकोटे, श्रीकांत सिताराम जाधव (राक़ेशेगाव ता़तुळजापूर)े, अमिर जमाल शेख (रा़नांदुरी), उमाकांत संगाप्पा पाटील (राख़ुदावाडी), श्रीशैल्य किसन हिप्परगे (राफ़ुलवाडी), फरिद नबीलाल शेख (रा़ येवती) यांनी संगणमत करून वैष्णोदेवी फूड प्रोडक्टस्च्या बॉयलर विभागात ९ एप्रिल २०१२ ते १४ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत लाकडाच्या पुरवठ्यात खोट्या नोंदी केल्या़
या नोंदी खऱ्या असल्याचे बनावट दस्ताऐवज तयार करून ७० लाख, ५८ हजार ६८८ रूपयांचा अपहार करून कंपनीची दिशाभूल करीत फसवणूक करून बनावट अभिलेखे तयार केल्याची तक्रार अंतर्गत लेखापरिक्षक महंमद बागवान यांनी नळुदर्ग पोलीस ठाण्यात दिली़ सदरील फिर्यादीवरून वरील सहा जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, सदरील घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विधाते हे करीत आहेत़ (वार्ताहर)