‘सहस्त्रकुंडा’त अडकलेल्या ७ पर्यटकांना वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:56 IST2017-09-15T00:56:44+5:302017-09-15T00:56:44+5:30
सहस्त्रकुंड धबधब्याचे पाणी अचानक वाढल्याने धबधबा पाहण्यासाठी आलेले ७ पर्यटक मध्यभागी अडकले. सातही जणांना तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात भोईंसह पोलिस व महसूल प्रशासनाला यश आले.

‘सहस्त्रकुंडा’त अडकलेल्या ७ पर्यटकांना वाचविले
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लापूर : सहस्त्रकुंड धबधब्याचे पाणी अचानक वाढल्याने धबधबा पाहण्यासाठी आलेले ७ पर्यटक मध्यभागी अडकले. सातही जणांना तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात भोईंसह पोलिस व महसूल प्रशासनाला यश आले.
इस्लापूरपासून चार कि़मी़ अंतरावर असलेला सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून येत असतात. गुरुवारीही बरेच पर्यटक धबधबा परिसरात होते. यातील ७ जण धबधब्याची धार पाहण्यासाठी मध्यभागी उभे होते. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांना मध्यभागातून बाहेर निघणे अवघड झाले. सात पर्यटकात ५ पुरूष व २ महिलांचा समावेश होता. सातही जण जीव मुठीत घेवून मदतीची याचना करीत होते. हा प्रकार बाहेर उभ्या पर्यटकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रथम इस्लापूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिस उपनिरिक्षक विक्रम विठूगोने, गोपनीय शाखेचे योगेश कोकणे, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर सरोदे आदी घटनास्थळी लगेच पोहोचले. येथे अशा घटना नेहमीच घडत असतात. त्यामुळे बचाव कार्यासाठी मदत करणारे भोई, देविदास भटेवाड, दिलीप तुमलवाड, विवेकांनद पाटील, संभाजी झाडे, नामदेव राठोड, अरविंद राठोड, सदिंप काळे, सयाजी टेकलवाड, साईनाथ वासेवाड यांना सोबत घेवून दोरीच्या सहाय्याने सातही पर्यटकांना तीन तासांच्या प्रयत्नानंतर सुखरुप बाहेर काढण्यात आले.
पर्यटकात श्यामराव झिंगू राठोड (रा़राजगड वय ७०), कांताबाई चव्हाण (रा़बोधडी, वय ४०), जनार्धन गायकवाड (रा़चिखलीकर, वय २२), संदीप ग्यानबा नरवाडे (राग़ोकुंदा वय), रवीराम राठोड (रा़चिंचोली, वय २७), तोतीबाई राठोड (रा़बोधडी, वय ७०), गोची बळीराम जाधव (रा़मुरली) यांचा समावेश होता.
घटनेची माहिती मिळताच किनवटचे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार नरेंद्र देशमुख, मंडळ अधिकारी लोढे इस्लापूरचे स.पोनि रामेश्वर कायंदे या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट घेवून याबाबत संपूर्ण माहिती घेतली़