राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबादचे ७ खेळाडू महाराष्ट्राच्या संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:24 IST2019-02-03T00:24:47+5:302019-02-03T00:24:54+5:30

आसाम येथे आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील सात खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार, अभय शिंदे, तुषार आहेर, सय्यद इर्शाद, हर्षदा वडते, कशीस भराड, वैदेही लोहिया यांचा समावेश आहे.

7 players from Aurangabad for National Fencing Championship in Maharashtra | राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबादचे ७ खेळाडू महाराष्ट्राच्या संघात

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबादचे ७ खेळाडू महाराष्ट्राच्या संघात

औरंगाबाद : आसाम येथे आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील सात खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार, अभय शिंदे, तुषार आहेर, सय्यद इर्शाद, हर्षदा वडते, कशीस भराड, वैदेही लोहिया यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू उद्या, रविवारी प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करणार आहेत. या संघासोबत मार्गदर्शक म्हणून शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त स्वप्नील तांगडे गेले आहेत. या खेळाडूंना महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष एस.पी. जवळकर, सचिव दिनेश वंजारे, मंजू खंडेलवाल, अजय त्रिभुवन, सागर मगरे, संजय भूमकर, राकेश खैरनार, मच्छिंद्र राठोड आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: 7 players from Aurangabad for National Fencing Championship in Maharashtra