वर्षभरात एसटीचे ६८ अपघात

By Admin | Updated: December 28, 2015 00:16 IST2015-12-28T00:06:53+5:302015-12-28T00:16:56+5:30

उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना विविध ठिकाणी झालेल्या ६८ अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाला असून, ३६ जणांना कायम अपंगत्व आले आहे़

68 road accidents in the year | वर्षभरात एसटीचे ६८ अपघात

वर्षभरात एसटीचे ६८ अपघात


उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना विविध ठिकाणी झालेल्या ६८ अपघातात ३३ जणांचा मृत्यू झाला असून, ३६ जणांना कायम अपंगत्व आले आहे़ तर १७९ जण हे जखमी झाले आहेत़ महामंडळाने मयतांच्या वारसांना व जखमींना तात्कालीक, औषधोपचार, पीफॉर्म व न्यायालयाचे निर्देश अशा विविध प्रकारे २ कोटी ७१ लाख ६२ हजार २५९ रूपयांची आर्थिक मदत केली आहे़ दरम्यान, महामंडळाकडील जुन्या बसेसमुळे चालक हैराण झाले असून, अशा बसेसमुळेही अपघाताला निमंत्रण मिळत आहे़
शहरी विशेषत: ग्रामीण भागातील प्रवाशांची ‘धमणी’ म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना ओळखले जाते़ ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या महामंडळाने ‘सुरक्षित प्रवासा’वर अधिक भर दिला आहे़ मात्र, महामंडळाच्या बसेसना होणारे अपघात कायम आहेत़ यावर्षी आजवर झालेल्या विविध अपघातापैकी ६८ अपघातातील मयतांच्या वारसांना व जखमींना महामंडळाने आर्थिक मदत केली आहे़ बस अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे़ यात तात्कालीक मदत म्हणून १ लाख २० हजार रूपयांची मदत करण्यात आली होती़ तर पी फॉर्मद्वारे चार प्रकरणात ४ लाख रूपये, न्यायालयाच्या आदेशानुसार ५ प्रकरणात १२ लाख ९६ हजार २१८ रूपयांची मदत करण्यात आली आहे़ अपघातात कायम विकलंगतेत पर्यावसण होणारी अंशत: दुखापत १४ प्रवशांना झाली असून, त्यांना तात्काीक ७५४४ रूपये तर औषधोपचारासाठी २ प्रवाशांना ६४९९ रूपये मदत करण्यात आली आहे़ पी फॉर्मद्वारे दोघांना १ लाख ५० हजार रूपये तर न्यायालयाच्या आदेशावरून १८ जणांना ८ लाख ६८ हजार ८९१ रूपयांची मदत देण्यात आली आहे़ अंशत: दुखापतीत ८ प्रवाशांना आले आहे़ त्यांना तात्कालीक ६५७८ रूपये, औषधोपचार प्रकरणात एकाला ५४४१ रूपये, तर न्यायालयाच्या आदेशावरून १४ प्रवाशांना ७ लाख ६८ हजार ८६८ रूपयांची मदत करण्यात आली आहे़ तात्पुरत्या विकलांगतेत पर्यावसन होणाऱ्या ७ जखमींना ४६७८ रूपये, एकाला औषधोपचार कामी ६०१० रूपये तर न्यायायाच्या आदेशावरून ११ जणांना ७ लाख ५८७० रूपये देण्यात आले आहेत़ दोष असण्याच्या तत्वावरील अपघातातील नुकसानभरपाईत पी फॉर्मद्वारे तीन मयतांच्या वारसांना ३ लाख रूपये, तर न्यायालयाच्या आदेशावरून तीन प्रकरणात १० लाख ६३ हजार ९६७ रूपये भरपाई देण्यात आली आहे़ कायम विकलांगत्व आलेल्या दोघांना पीफॉर्मद्वारे एक लाख रूपये, तर १८ प्रकरणात न्यायालयाच्या आदेशावरून १० लाख ५८ हजार ५२८ रूपये भरपाई देण्यात आली आहे़ तात्पुरत्या विकलांगत्व आलेल्या २२ जणांना न्यायलयाच्या आदेशावरून ८ लाख २३ हजार ५३७ रूपये तर मालमत्तेचे नुकसान १९ प्रकरणात न्यायालयाच्या आदेशावरून ५ लाख ६९ हजार ६८७ रूपये भरपाई देण्यात आली आहे़ तर दोष नसण्याच्या तत्वावर एकूण एकूण ६१ प्रकरणात न्यायालयाच्या आदेशावरून ४ लाख ३१ हजार १५०३ रूपये नुकसानभरपाई देण्यात आली.

Web Title: 68 road accidents in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.