शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

सूरतहून कुरियरने बनावट नावावर नायलॉन मांजाच्या ६७२ गड्ड्या छत्रपती संभाजीनगरात आल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 17:25 IST

मुजीब अहमदच्या भावाने बनावट नाव, पत्त्यावर मागितली होती ऑर्डर; गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : ऑक्टोबर महिन्यापासूनच शहरात सूरत व अन्य शहरांतून नायलॉन मांंजाची तस्करी सुरू होती. पतंग विक्रेता मुदस्सिर ऊर्फ मुजीब अहमद नजीर अहमदचा भाऊ समीर अहमद नजीर अहमद (रा. रोशन गेट) याने दोन वेळेस ऑर्डर दिली होती. त्यातील १ नोव्हेंबर रोजी शहरात आलेली ६७२ रिल्सची ऑर्डर न स्वीकारता कुरिअरच्या कार्यालयात तशीच राहू दिली होती. हे कळताच गुन्हे शाखेने मुकुंदवाडीत छापा मारून हा मुद्देमाल जप्त करत समीरसह त्याचा मेहुणा शेख फईम शेख नईम (रा. बाबर कॉलनी, कटकट गेट) याला अटक केल्याचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सांगितले.

सोमवारी रात्रीतून पाच नायलाॅन मांजा विक्रेत्यांना अटक करत २०६ गट्टू जप्त करण्यात आले. यात काफिलउल्ला खान फजलउल्ला खान व शेख मुशीर अहमद अश्फाक अहमद (दोघे रा. शरीफ कॉलनी), शेख फरदीन अब्दुल रज्जाक (रा. शहाबाजार), तालेबखान शेरखान (रा. फातेमानगर), मुदस्सिर ऊर्फ मुजीब अहमद नजीर अहमद (रा. आजम कॉलनी, रोशन गेट) यांना अटक करण्यात आली होती.

१२ बॉक्सद्वारे नायलाॅन मांजा आलामुकुंदवाडीतील कुरिअर कंपनीने पोलिसांशी संपर्क साधला. महिन्याभरापासून मागवलेल्या संशयास्पद कुरिअरबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक संदीप काळे यांनी कुरिअर तपासले असता त्यात १२ बॉक्समध्ये ६७२ रील आढळून आले.

भावानेच दिली ऑर्डरकुरिअरच्या कार्यालयात आलेले सदर पार्सल प्रदीप पाटीलच्या नावे होते. पोलिसांनी पार्सलवरील मोबाइल क्रमांक तपासला असता तो युनूस कय्युम शेख कुरेशी (रा. आदर्शनगर, जाफराबाद) च्या नावे निघाला. पोलिसांनी त्याची चौकशी केली. हे सीमकार्ड त्याने फईमला वापरायला दिल्याचे सांगितले. फईमने त्याचा मेहुणा समीरला वापरायला दिल्याचे सांगितले. दोघांनाही अटक करण्यात आली. समीर हा अटकेतील मुदस्सिरचा सख्खा भाऊ आहे.

दोन वेळा आले पार्सलकुरिअर कंपनीच्या माहितीनुसार प्रदीप पाटीलच्या नावे ऑगस्ट महिन्यातही पार्सल आले होते. तेही नायलॉन मांजाचेच असल्याचा संशय पोलिसांचा आहे. दुसरे पार्सल सूरतवरून २९ ऑक्टोबर रोजी पाठवले गेले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Nylon Manja Seized in Aurangabad: Smuggled via Courier from Surat

Web Summary : Aurangabad police seized 672 nylon manja reels smuggled from Surat via courier under a false name. Two arrested, including a brother of a kite seller, who ordered the illegal consignment. Earlier, five sellers were arrested with 206 spools.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर