शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

६५ अतिक्रमणांवर हतोडा

By admin | Updated: March 17, 2015 00:40 IST

जालना : येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या भिंत परिसरातील ६५ अतिक्रमणे अखेर नगरपालिका व सदर बाजार पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी हटविली

जालना : येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या भिंत परिसरातील ६५ अतिक्रमणे अखेर नगरपालिका व सदर बाजार पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी हटविली. तब्बल सहा तास अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू होते. ही अतिक्रमणे हटविण्याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी दीक्षितकुमार गेडाम यांच्यासमवेत नगरपालिका मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे व अन्य अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. मात्र या ठिकाणी १९८७ पूर्वीपासून लोक राहतात, त्यामुळे अतिक्रमणे हटवू नयेत, अशी मागणी काही नागरिकांनी केली होती. १३ मार्च रोजी अतिक्रमण हटाव पथक या भागात आल्यानंतर अतिक्रमणधारकांनी आम्हाला अतिक्रमण हटविण्यास संधी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र काही लोकांनी विरोध दर्शविला होता.या पार्श्वभूमीवर रविवारपर्यंतची मुदत पालिकेने दिली होती. परंतु नागरिकांनी अतिक्रमणे स्वत:हून न हटविल्याने सोमवारी सकाळी १० वाजता नगरपालिका व पोलिसांचे संयुक्त पथक सर्व ताफ्यानिशी या भागात पोहोचले. दोन जेसीबी, आठ ट्रॅक्टर तसेच दीडशे कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह या पथकाने अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ केला. काही घरे, हॉटेल्स, टपऱ्या, दुकाने अशी एकूण ६५ अतिक्रमणे हटविण्यात आली. दुपारी ४ वाजेपर्यंत हे काम सुरू होते. यावेळी पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, उपनिरीक्षक श्रीमंतराव ठोंबरे, मोहिते, अर्जुन झावरे, गावडे, भंडारे, स्वच्छता निरीक्षक देवानंद पाटील, संजय खर्डेकर, जाधव आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)