शहरात दाखल होणारे ६५ नागरिक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:04 IST2021-04-09T04:04:51+5:302021-04-09T04:04:51+5:30
चिकलठाणा येथे ११ पॉझिटिव्ह, हर्सूल टी पॉइंटवर २६, कांचनवाडीत १५, झाल्टा फाटा १, नगर नाका ४, दौलताबाद टी ...

शहरात दाखल होणारे ६५ नागरिक पॉझिटिव्ह
चिकलठाणा येथे ११ पॉझिटिव्ह, हर्सूल टी पॉइंटवर २६, कांचनवाडीत १५, झाल्टा फाटा १, नगर नाका ४, दौलताबाद टी पॉइंट येथे ८ जण पॉझिटिव्ह आले.
शासकीय कार्यालयांमध्ये १३ अभ्यागत पॉझिटिव्ह
औरंगाबाद : शासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांची कोरोना तपासणी करण्यात येत असून, गुरुवारी या तपासणीत १३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. महापालिका मुख्यालय १, पोलीस आयुक्त कार्यालय २, उच्च न्यायालय ३, आरटीओ ऑफिस २, जिल्हाधिकारी कार्यालय १, रजिस्ट्री कार्यालय २ तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात २ जण पॉझिटिव्ह आढळून आले.
स्टेशन, विमानतळावर १५१ प्रवाशांची तपासणी
औरंगाबाद : रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर गुरुवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून १५१ प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. बुधवारी ज्या प्रवाशांची तपासणी केली होती त्यातील ११ जण आज पॉझिटिव्ह आढळून आले.
दिवसभरात ६ हजार ३७६ संशयित रुग्णांची तपासणी
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तपासण्या सुरू केल्या आहेत. गुरुवारी महापालिकेने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत तब्बल ६ हजार ३७६ संशयित नागरिकांची तपासणी केली. अँटीजेन पद्धतीने ३ हजार ३७४ नागरिकांची तपासणी केली असता त्यामध्ये २३० पॉझिटिव्ह आढळून आले. ३ हजार २ नागरिकांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. शुक्रवारी सकाळी त्यांचा अहवाल महापालिकेला प्राप्त होईल.